शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

सीएमएस फाल्कन क्लबने पटकावले जेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खडकीयन्स स्पोर्ट्स क्‍लब आयोजित ‘नाईन अ साइड’ छत्रपती शिवाजी महाराज करंडक फुटबॉल स्पर्धेत सीएमएस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खडकीयन्स स्पोर्ट्स क्‍लब आयोजित ‘नाईन अ साइड’ छत्रपती शिवाजी महाराज करंडक फुटबॉल स्पर्धेत सीएमएस फाल्कन अ क्लबने इंद्रायणी स्पोटर्स अ क्लबचा सडनडेथमध्ये १०-९ अशा गोलफरकाने पराभव करुन जेतेपदावर नाव कोरले. आर. आर. बॉईज क्लबला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत ३९ संघांनी भाग घेतला होता.

खडकीतल्या एलफिस्टन रोड येथील मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत सुपवॉश डोलीने सडनडेथमध्ये नोंदविलेल्या गोलच्या जोरावर सीएमएस फाल्कन अ क्लबने बाजी मारली. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी बहारदार खेळ केला. खेळाच्या सातव्याच मिनिटाला इंद्रायणी क्लबच्या आशिष सिंगच्या सुरेख पासवर करमेंद्रा सरोजने गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. उपांत्य फेरीत इंद्रायणी स्पोटर्स अ क्लबने संगम यंग बॉईजचा आणि सीएमएस फाल्कन अ क्लबने आर. आर. बॉईज क्लबचा दोन गोलच्या फरकाने पराभव केला.

स्पर्धेतील ‘सर्वोत्तम खेळाडू’चा मान फाल्कन क्लबच्या शिबू सनीला मिळाला. याशिवाय ‘उत्कृष्ट गोलरक्षक’ इंद्रायणी क्लबचा ह्रषीकेश शेडगे, ‘उत्कृष्ट डिफेंडर’ खडकीयन्स क्लबचा संमय मुखर्जी ठरला. शिस्तबद्ध संघाचे पारितोषिक रिअल पुणे युनायटेड संघाने मिळविले. स्पर्धेतील विजेत्या सीएमएस फाल्कन क्लबला २५ हजार ६६६ रुपये रोख व करंडक तर उपविजेत्या इंद्रायणी क्लबला १५ हजार ६६६ रुपये व करंडक देण्यात आला. खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद, पूजा आनंद, माजी आमदार रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, एस. एस. अहलुवालिया, तौसिफ अन्सारी, मनीष बासू, बंडू शिंदे, इझाज सय्यद आदी पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थित होते.