शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दहशत पसरविणाऱ्याला कोठडी

By admin | Updated: July 9, 2015 03:03 IST

तलवारीच्या जोरावर भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्या उलथवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न येरवडा परिसरात झाला.

पुणे : तलवारीच्या जोरावर भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्या उलथवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न येरवडा परिसरात झाला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.किशोर ऊर्फ लाल्या अरुण वाघमारे (वय ३०, रा. भीमज्योत मित्र मंडळाजवळ, येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नामदार प्रदीप विठ्ठल शेलार यांनी फिर्याद दिली. ही घटना लक्ष्मीनगर येथील क्षीरसागर हॉल चौक परिसरात मंगळवारी घडली. आरोपी तलवार घेऊन परिसरात फिरत होता व त्याने दोन भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्या उलथवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. आरोपी हा सराईत गुंड आहे. येरवडा परिसरातील मजूर व किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांना हत्याराचा धाक दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न तो करीत असतो. तो गुंडप्रवृत्तीचा असल्याने तक्रार देण्यास कोणी धजावत नाही. शस्त्रास्त्रांच्या जोरावर त्याने काही पैसे उकळले आहेत का, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याचा सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. (प्रतिनिधी)