शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

विषारी औषध प्राशन केलेल्या चाकण नगरपरिषदेतील सफाई कामगार दांपत्यापैकी पतीचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 1:16 PM

कुटुंब आणि नगर परिषद कार्यालयात होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून धोत्रे दांपत्याने १२ जून रोजी विषारी औषध प्राशन केले होते.

ठळक मुद्देआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चाकण नगर परिषदेच्या तीन कामगारांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल 

चाकण : येथील चाकण नगर परिषदेच्या सफाई कामगाराचा मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या तीन कामगारांसह एकूण नऊ जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलगा अविनाश अनिल धोत्रे ( वय २२, रा. खंडोबा माळ, चाकण ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२० जून) सकाळी सहा वाजता अनिल चिमाजी धोत्रे (वय ४६, रा. खंडोबा माळ, चाकण) या सफाई कामगाराचा वायसीएम रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला. त्यांची पत्नी शांताबाई अनिल धोत्रे यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. याप्रकरणी चाकण नगरपरिषदेचे कर्मचारी विजय भोसले, मंगल गायकवाड, संगीता घोगरे ( सर्व रा. आंबेडकरनगर, चाकण ) तसेच फियादीची पत्नी कोमल, सासरे शाम बाबू मंजुळे, सासू सुनीता, चुलत सासरे रमेश बाबू मंजुळे, चुलत सासू छाया, मेव्हणा राजू ( सर्व रा. पनवेल, जि.रायगड ) या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोत्रे दांपत्याने १२ जून रोजी नगर परिषदेतील मानसिक छळाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते. पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, शांताबाई व अनिल हे दोघे चाकण नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून कामाला होते. फिर्यादी अविनाशचे २०१६मध्ये पनवेल येथील कोमल हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर दोनच महिन्यात कोमलने घरात सतत भांडण करून शिवीगाळ करून माहेरी निघून गेली. वकिलामार्फत नोटीस पाठवत दहा लाखांच्या पोटगीची मागणी मुलगा अविनाशच्या सासरच्या लोकांकडून करण्यात आली होती. त्यांनी मागितलेल्या भरपाईमुळे धोत्रे दांपत्य कायम तणावाखाली होते.त्यातच चाकण नगर परिषदेत काम करीत असलेल्या ठिकाणी मुकादम विजय भोसले, मंगल गायकवाड हे नेहमी कामगारांसमोर अपमानास्पद वागणूक देत होते.  काम नीट करीत नसलेबाबत त्यांना दोन नोटीसही दिल्या होत्या. तर विजय भोसले याने अविनाशच्या आई-वडिलांचे पगार थांबवले होते. त्यामुळे होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून या दांपत्याने विषारी औषध प्राशन केले. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत पवार पुढील तपास करत आहेत.  

टॅग्स :ChakanचाकणDeathमृत्यूCrimeगुन्हाPoliceपोलिस