शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात एकोपा गल्लीत दुरावा..! खराडीत राष्ट्रवादी-शिवसेनेत जुंपली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 15:17 IST

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे चितेवर झोपुन आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी....

अमोल अवचिते- 

पुणे : चितेवर झोपुन आंदोलन करणे, ही केवळ स्टंटबाजी आहे. अपयश झाकण्यासाठी सतत विरोधात आहोत, असे सांगून नागरिकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न प्रभाग क्रमांक ४ चे राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक करतात, असा आरोप शिवसेनेचे सह चिटणीस राजाभाऊ चौधरी यांनी केला आहे. 

खराडी गावातील स्मशानभूमीचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. याच निषेध करत नगरसेवक भैयासाहेब जाधव यांनी चितेवर झोपून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षातील नगरसेवक आहोत अस सातत्याने सांगितले जाते. मात्र यांना पालिकेचा किती निधी मिळतो हे  जनतेला सांगत नाहीत. त्यांच्या कार्यकाळात किती मोठी कामे केली, हा संशोधनाचा विषय आहे. नगरसेवक शाळेचा, डॉक्टरचा गणवेश परिधान करून आंदोलने करत जनतेची दिशाभूल करण्याचे काम करतात. असा आरोप चौधरी यांनी केला आहे.  ......  राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमुख्यमंत्री आहे, असे असताना देखील खराडीत सत्ताधारी पक्षातच धुसफूस असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. शिवसेनेच्या एका नेत्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर टीका केल्याने सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांना राज्यात सत्तेत असल्याचा विसर पडला की काय अशी चर्चा खराडीत रंगली आहे.    .... जर कोणाला ही स्टंटबाजी वाटत असेल, आणि त्यातून नागरिकांचा प्रश्न सुटणार असेल तर त्यात आम्ही समाधानी आहोत.  स्मशानभूमीचे तरी राजकारण करू नये. आंदोलन केवळ जनतेच्या हितासाठीच केले जाते.  नागरिक सूज्ञ आहेत. महापालिकेने एक महिन्यात बजेट देऊन जर काम पूर्ण केले नाही तर महापालिकेच्या आवारात तीव्र आंदोलन केले जाईल, अशी प्रतिक्रिया प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दिली आहे. 

टॅग्स :PuneपुणेChandan NagarचंदननगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे