LPG Gas Crisis: गॅस पुरवठ्याबाबत स्पष्टता जाहीर करावी; रेस्टॉरंट चालकांची मागणी, पाईपद्वारे गॅस जोडची प्रशासनाची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 11:49 IST2026-03-28T11:49:31+5:302026-03-28T11:49:46+5:30

रेस्टॉरंट उद्योगासाठी एलपीजीचा पुरवठा पुढील काही आठवड्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे

Clarity should be announced regarding gas supply; Restaurant operators demand, administration suggests connecting gas through pipes | LPG Gas Crisis: गॅस पुरवठ्याबाबत स्पष्टता जाहीर करावी; रेस्टॉरंट चालकांची मागणी, पाईपद्वारे गॅस जोडची प्रशासनाची सूचना

LPG Gas Crisis: गॅस पुरवठ्याबाबत स्पष्टता जाहीर करावी; रेस्टॉरंट चालकांची मागणी, पाईपद्वारे गॅस जोडची प्रशासनाची सूचना

पुणे: व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टाक्यांचा पुरवठा करण्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत, त्यामुळे रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतची स्पष्टता जाहीर करावी, अशी मागणी नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करत प्रशासनाने रेस्टॉरंट चालकांना पाइपलाइनद्वारे गॅस जोड घेण्याची सूचना केली.

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय)च्या पुणे विभागाचे प्रतिनिधी किशोर सरपोतदार, सायली जहागीरदार व अन्य पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आले आहेत. नियमित पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली असून व्यवसायावर अनिष्ट परिणाम होत आहे, काही रेस्टॉरंट चालकांना त्यांच्याकडील पदार्थ कमी करावे लागले काहींनी तर व्यवसाय बंद ठेवला असल्याचे सांगण्यात आले.

गॅस टाक्यांचा पुरवठा सुरळीत आहे, मात्र युद्धामुळे त्याच्या वितरणाच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत असा दावा जिल्हा प्रशासनाने केला. जिल्हाधिकाऱ्यांनी रेस्टॉरंट चालकांनी त्यांच्या परिसरात पाइपलाइनद्वारे गॅस आला असेल तर त्वरित त्याचा जोड घ्यावा, असे सुचवले. रेस्टॉरंट उद्योगासाठी एलपीजीचा पुरवठा पुढील काही आठवड्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू होईल, असे शिष्टमंडळाला सांगण्यात आले. चर्चा सकारात्मक झाली असे, सायली जहागीरदार यांनी सांगितले.

Web Title : पुणे में एलपीजी संकट, रेस्टोरेंट प्रशासन से स्पष्टता चाहते हैं

Web Summary : पुणे के रेस्टोरेंट एलपीजी आपूर्ति में बाधाओं का सामना कर रहे हैं, जिससे बंद होने का खतरा है। रेस्टोरेंट एसोसिएशन ने जिला प्रशासन से स्पष्टता मांगी है। प्रशासन ने पाइप से गैस कनेक्शन का सुझाव दिया और हफ़्तों में धीरे-धीरे आपूर्ति बहाल करने का आश्वासन दिया।

Web Title : Pune Restaurants Face LPG Crisis, Seek Clarity from Administration

Web Summary : Pune restaurants are facing LPG supply disruptions, threatening closures. Restaurant association seeks clarity from district administration. The administration suggests piped gas connections and assures gradual supply restoration in weeks.