शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

शहरातील पहिला कॉफर बंधारा वादात 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 3:59 PM

मुळा-मुठा नदीपात्रात खासगी गृहरचना संस्थेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील पहिला कॉफर बंधारा बांधण्यात येत आहे.

ठळक मुद्देमुंढव्यातील मुळा-मुठा नदीपात्रातील बंधारा कामाच्या सरकारी मंजुरीवर विरोधकांचा आक्षेप

- अमोल अवचिते- पुणे : खराडी मुंढवा परिसरातील  मुळा-मुठा नदीपात्रात खासगी गृहरचना संस्थेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील पहिला कॉफर बंधारा बांधण्यात येत आहे. या प्रकल्पास खडकवासाला पाटबंधारे विभागाकडून परवानगी देण्यात आली असली तरी तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या बंधाऱ्याच्या कामावर विरोधकांनी आक्षेप घेत हरित लवादाकडे याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या संस्थेची सन २०३१ ची लोकसंख्या ४००० इतकी गृहीत धरून पाण्याच्या मागणीनुसार दर दिवशी, प्रतिव्यक्ती या निकषानुसार १.९७१ दलघमी येते. त्यामध्ये २० टक्के वहन तूट धरून २.३६५२ व २ टक्के पुनर्वापर ०.४७३ वगळून संस्थेच्या मागणीनुसार १.८९ दलघमी पाणी देण्यास  खडकवासला पाटबंधारे विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. १५ मार्च २०१९ च्या दरम्यान बंधाऱ्याच्या प्रकल्पाचे काम चालू झाले आहे. येत्या पावसाळ्याच्या  आतमध्ये हा बंधारा काढणे व्यावसायिकास बंधनकारक करण्यात आले आहे. .........काय आहे कॉफर बंधारा४एकूण अडीचशे मीटर रुंदी असलेल्या नदीपात्रापैकी ऐकशे पंचवीस मीटर रुंदीचा बंधारा बांधण्यात आला आहे. त्याला कॉफर डॅम म्हणतात. हा डॅम नदीच्या खोल क्षेत्रात बांधला आहे. ४खोल जागेत विहीर बांधून त्या विहिरीतून जलवाहिनीद्वारे प्रकल्पास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या पाण्यावर प्रकिया करून शुद्ध पाणी सोसायट्यांना पुरविण्यात येणार आहे. ४नदीतील पाणी वापरल्यामुळे शासनाला यातून महसूलदेखील मिळणार आहे, अशी माहिती या प्रकल्पाच्या बांधकाम व्यावसायिकाने ‘लोकमत’ला दिली.  ४पिन्नी व शरद सहकारी गृहरचना सोसायटीच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पासाठी या बंधाºयाचे काम चालू आहे. .................

कॉफर डाँमसाठी परवानगी दिली असली तरी त्यामध्ये कालावधी किती लागणार याचा उल्लेख केला नाही. जर अचानक पाऊस झाला आणि याचा नागरिकांना त्रास झाला तर याला जबाबदारी कोणाची? अशा प्रकारे परवानगी देऊन शासन नागरिकांच्या जिवाशी खेळ करत आहे. ८० टक्के नदीपात्र अडवले गेल्याने जलपर्णी साठून नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. एक प्रकारे नदीचे पाणी बिल्डरच्या घशात घालून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. या प्रकल्पासाठी हरित लवादाची परवानगी नाही. याप्रकरणी जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्याकडे  तक्रार करणार आहे.    - लता धायरकर (नगरसेविका)

...............या प्रकल्पास शासनाची मंजुरी आहे. संबंधित ठिकाणाला भेट दिली असून कोणतेही बेकायदा काम सुरू नाही. नागरिकांनी याला विरोध करू नये. मेअखेर बंधारा काढण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नदीपात्रास कोणताही अडथळा येणार नाही.- पांडुरंग शेलार (कार्यकारी अभियंता)....या प्रकल्पास पाटबंधारे विभागाची परवानगी आहे. कोणतेही  बेकायदेशीर काम सुरू नाही. सोसायटीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प उभारला जात आहे. पाण्यात जलपर्णी या प्रकल्पामुळे अडलेली नाही, तरीसुद्धा ती काढण्याचे काम आम्ही करीत आहोत. नदीतील पाणी वापरणार असल्याने त्याचा महसूल शासनदरबारी भरणार आहोत. तसा करारदेखील करण्यात आला आहे.       - प्रकल्पाचे बांधकाम व्यावसायिक........जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली असून पालिकेच्या अधिकरीवर्गाने याची पाहणी केली आहे. बेकायदा काम करणे चुकीचे असून यावर योग्य ती कारवाईची मागणी करण्यात आली आहे. असे नदीपात्रात काम करण्याची परवानगी पाटबंधारे विभागाकडून दिली असेल, तर संबंधित अधिकाºयांवर कारवाईची मागणी करण्यात येईल. या सर्व प्रकाराकडे पाटबंधारे विभाग डोळेझाक करत आहे. यामध्ये भाजपचा कोणत्या नेत्याचा संबंध आहे काय, याची चौकशी करण्याची गरज आहे. याप्रकरणी हरितलवादाकडे दाद मागू.  - चेतन तुपे (विरोधी पक्षनेते)   

........................

बांधकाम व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करावी, असे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे. याची दखल घेतली गेली नाही तर, तीव्र आंदोलन करू. जलपर्णीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.     - भैयासाहेब जाधव (नगरसेवक) ..........नागरिकांची विरोधाची कारणे १. नदीपात्रात खोदाईचे काम केल्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याची शक्यता आहे. ...........२ दरवर्षी नदीला पूर येत असल्याने या भागातील नागरिकांना या कामाचा त्रास होण्याची शकयता आहे. ....३  अशा प्रकल्पांमुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते. .....४  या बंधाºयामुळेच जलपर्णी अडली आहे, याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे........५  नदीपात्रात खोदाई करून व नव्याने भराव टाकून ती जमीन हडपण्याचा बांधकाम व्यावसायिकांचा डाव आहे. 

टॅग्स :PuneपुणेMundhvaमुंढवाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका