शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षापासून शहरात एकही ‘कंटेन्मेंट झोन’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:07 IST

पुणे : कोरोनाबाधित रूग्णांची संख्या अधिक असलेल्या भागात महापालिकेकडून जाहिर करण्यात आलेले सद्यस्थितीचे ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ (कंटन्मेंट झोन) ...

पुणे : कोरोनाबाधित रूग्णांची संख्या अधिक असलेल्या भागात महापालिकेकडून जाहिर करण्यात आलेले सद्यस्थितीचे ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ (कंटन्मेंट झोन) ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून रद्द करण्यात आले आहेत़

महापालिकेच्या या निर्णयामुळे नववर्षात पुणे शहरात आता कोरोनाबाधितांचा भाग म्हणून ओळखला जाणारा एकही कंटन्मेंट झोन असणार नाही़ याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत़

कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी व त्या बाधितांपासून इतरांना संसर्ग होऊ नये़ या उद्देशाने ज्या भागात कोरोनाबाधित अधिक आहेत, त्या भागात महापालिकेने ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ जाहिर करून ते सील करण्याचे धोरण स्विकारले होते़ सप्टेंबर महिन्यात पुण्यात शंभर सव्वाशेपर्यंत पोहचलेले ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या व संसर्ग कमी झाल्याने डिसेंबर महिन्यात ६ वर आले होते़

गुरूवारी ही क्षेत्रेही महापालिकेने निरंक केले असून, गरज पडल्यास विशिष्ट इमारत, सोसायटी येथे कोरोनाबाधितांची संख्या अधिक आढळल्यास संबंधित क्षेत्राचे अधिकारी तो भाग ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून जाहिर करू शकतील असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे़ दरम्यान शहरातील सदर क्षेत्र निरंक झाली असली तरी, कंटन्मेट झोनबाबत केंद, राज्य व महापालिकेने निर्गमित केलेले आदेश शहरात लागू राहणार आहेत़

------------------------------------