पुणे : महापालिका रुग्णालये व दवाखान्यांद्वारे नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्यसेवा मिळणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्यविषयक सुधारणा कामांचा नियमित आढावा घेतला जाईल, असे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले. त्यांनी बोपोडी व औंध रोड परिसरातील महापालिका रुग्णालये व दवाखान्यांना प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. परिसरातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी उपाय योजनांबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
यावेळी महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे, परिमंडल क्रमांक २ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले, औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेमलता घाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गुणेश बगाडे तसेच शेवाळे दवाखान्याच्या डॉ. मैथिली कुलकर्णी उपस्थित होत्या. बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय येथे पाहणी करताना रुग्णालय तातडीने युद्धपातळीवर कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले. अद्ययावत यंत्रसामग्री, आवश्यक सोयी-सुविधा आणि मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी कै. द्रोपतीबाई मुरलीधर खेडेकर रुग्णालयाचीही पाहणी करण्यात आली. तेथील आवश्यक सुधारणा व उपाययोजना तातडीने राबवण्याची सूचना केली.
औंध रोड येथील बाबुराव गेनबा शेवाळे दवाखाना येथील आरोग्यसेवा केवळ बाह्यरुग्ण विभागापुरती मर्यादित न ठेवता, खेडेकर रुग्णालयाच्या धर्तीवर प्रसूतीगृह, फिजिओथेरपी सेंटर, रुग्णवाहिका तसेच एक्स-रे सुविधा सुरू करण्याच्या सूचना उपमहापौरांनी दिल्या.
Web Summary : Deputy Mayor Parshuram Wadekar emphasized providing quality healthcare through municipal hospitals. He inspected facilities in Bopodi and Aundh, ordering the immediate activation of Sanjay Gandhi Hospital with updated equipment and staff. Improvements at other facilities, including expanded services at Shewale Clinic, were also mandated.
Web Summary : उपमहापौर परशुराम वाडेकर ने नगर निगम के अस्पतालों के माध्यम से गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सेवा प्रदान करने पर जोर दिया। उन्होंने बोपोडी और औंध में सुविधाओं का निरीक्षण किया, और संजय गांधी अस्पताल को तत्काल अद्यतन उपकरणों और कर्मचारियों के साथ सक्रिय करने का आदेश दिया। शेवाले क्लिनिक में विस्तारित सेवाओं सहित अन्य सुविधाओं में सुधार भी अनिवार्य किया गया।