शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात निषेधाच्या पणत्या पेटवत नागरिकांनी केली दिवाळी साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 10:37 IST

कामगार पुतळा वसाहत मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होत असून, येथील झोपडी धारकाचे स्थलांतराचे काम गेले सहा महिन्यांपासून चालू आहे, काही झोपडीधारक सध्याच्या जागेवरच किंवा शिवाजी नगर भागांमध्ये उपलब्ध असलेल्या सरकारी भूखंडावर आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी करत आहेत

पुणे: कामगार पुतळा येथे होत असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीतमुळे, येथील झोपडपट्टीधारक नाराज असून त्यांचे स्थलांतर करताना त्यांचे म्हणणे ऐकूनच न घेता सरकार दमदाटीने स्थलांतर करत असून, या स्थलांतराला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. तो दर्शवण्यासाठी काल दिवाळीच्या पहिल्या दिवशी रस्त्यावरच पहिला दिवा पेटवत प्रकल्पग्रस्तांनी सरकारचा निषेध करत दिवाळी साजरी केली.

कामगार पुतळा वसाहत मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होत असून, येथील झोपडी धारकाचे स्थलांतराचे काम गेले सहा महिन्यांपासून चालू आहे, काही झोपडीधारक सध्याच्या जागेवरच किंवा शिवाजी नगर भागांमध्ये उपलब्ध असलेल्या सरकारी भूखंडावर आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी करत आहेत. परंतु या मागणीकडे सरकार, महामेट्रो हेतुपरस्पर दुर्लक्ष करीत आहेत. पुनर्वसन करताना येथील रहिवासी गेल्या साठ ते सत्तर वर्षे जुने असून त्यांचा उदरनिर्वाहाचे, शिक्षणाचे काय ? असे येथील नागरिक प्रश्न विचारत आहेत. शिवाजीनगर परिसरात अनेक सरकारी पडीक भूखंड असून ते सरकाराने ताब्यात घेत आम्हाला त्याच ठिकाणी राहण्याची घरे द्यावीत अशी आमची मागणी आहे. सध्या याप्रकरणी स्थानिक रहिवासी हे उच्च न्यायालयात  गेले आहेत.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कामगार पुतळा वसाहती मधील नागरिकांनी रस्त्यावर दिप प्रज्वलीत करून दिवाळीचा पहिला दिवा लावत सरकारला या दिव्यांच्या माध्यमातून शिक्षण, रोजगार या  मागणीचा संदेश दिला आहे. सरकारची दिवाळी सुखात आणि झोपडी धारकांची दिवाळी दु:खात  होत असल्याची भावना स्थानिकांनी या वेळी व्यक्त केली. कामगार पुतळा वसाहतीवर होणारी कारवाई व राज्य सरकारचा निषेध आज आम्ही या दिव्यांच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. यावेळी बबन भालके, हमीद शेख ,मयुर घोडे,विकी कांबळे, किशोर कांबळे, आप्पा आखाडे, शिरीष पाटीलस, खुबाई डेंगळे, कविता चव्हाण, हमीदा खान आदी स्थानिक रहिवाश्यांनी रस्त्यावर दिवे पेटवत सरकारचा निषेध व्यक्त केला.

टॅग्स :Puneपुणेshivajinagar-acशिवाजीनगरswargateस्वारगेटMetroमेट्रो