शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

शाळांसाठी ‘बाल संरक्षण धोरण’ तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 17:39 IST

शाळांमध्ये लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहिल्यानंतर प्रत्येक मुलं खरंच शाळेमध्ये सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देबाल हक्क कृती समिती महापालिकेला करणार सुपूर्त धोरण तयार करण्यासाठी जवळपास १०० मुलांशी संवाद, चर्चा

नम्रता फडणीस पुणे : शाळांमध्ये लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहिल्यानंतर प्रत्येक मुलं खरंच शाळेमध्ये सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटना रोखण्यासाठी शाळा प्रशासनाकडून आपापल्या परीने अनेक पावले उचलली जात असली तरी त्याकरिता शाळांसाठी एक सर्वकष धोरण असणे आवश्यक आहे. हीच बाब विचारात घेऊन बाल हक्क कृती समितीच्या पुढाकाराने मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शहरातील शाळांसाठी ‘बाल संरक्षण धोरण’ तयार करण्यात आले आहे.येत्या २० नोव्हेंबर रोजी जागतिक बाल हक्कदिनी हे धोरण महापालिका आयुक्तांकडे सुपूर्त केले जाणार आहे. प्रत्येक मुल हे त्याच्या बाल्यावस्था आणि अज्ञानामुळे असुरक्षित असते. इजा, दुखपात, हिंसा,अत्याचार याला ते सहजपणे बळी पडू शकते. सभोवतालचे वातावरण त्याच्यासाठी सुरक्षित नसेल तर नकारात्मक विचार आणि अयोग्य वर्तन यागोष्टींमुळे मुलाच्या मनात अधिकच असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. मुलाच्या शोषण आणि अत्याचाराचा परिणाम हा त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक बाबींवर होऊ शकतो. सर्व मुलांना मुलभूत शिक्षणाचा अधिकार आहे तसेच मुलांना शाळांमध्ये सुरक्षित वातावरण देणे ही देखील शाळा प्रशासनसह महापालिका आणि शासनाची प्रमुख जबाबदारी आहे. कारण मुलांच्या संरक्षणाचा विचार केल्याशिवाय शिक्षणाचा विचारच आपण करू शकत नाही..मुलांना संरक्षित वातावरण मिळावे यासाठी आवश्यक त्या कायदेशीर तरतुदी आणि व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. मुलांच्या विचारांचा आणि भावनांचा संबंधित सर्व प्रौढांनी आदर करायला हवा. बाल सहभागाचा विचार आणि व्यवस्था रूजायला हव्यात या दिशेने हे एक पाऊल उचलण्यात आली असल्याची माहिती बाल हक्क कृती समितीचे सुशांत सोनोने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.     शाळेमधली भिंत कोसळणे किंवा लहान मुलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या वाढत्या घटना यांच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी महापालिकेचे तत्कालिन आयुक्त कुणालकुमार यांच्याशी चर्चा झाली होती. या घटना रोखण्यासाठी ‘बाल संरक्षण धोरण’ तयार करण्याचा विचार पुढे आला . त्यांनीही त्याला सहमती दर्शविली.त्यानुसार हे धोरण तयार करण्यासाठी जवळपास १०० मुलांशी संवाद, चर्चा करण्यात आली. त्यातून शाळेचे वर्ग सुरक्षित नाहीत.सभोवतालचे वातावरण चांगले नाही अशा अनेक गोष्टी संवादातून समोर आल्या. त्यानुसार शिक्षण कायद्याचा अभ्यास करून हे  ‘बाल संरक्षण धोरण’ तयार करण्यात आले आहे. हे धोरण करण्यासाठी तारा मोबाईल क्रेशेस, न्यू व्हिजन, तेरे डेस होम्स, इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी, आयडेंटिटी फाउंडेशन, कागद काच कष्टकरी पंचायत, बीएसएसके, स्त्री मुक्ती संघटना व इतर अनेक संस्था संघटनांचा सहभाग मिळाला.महापालिकेने या धोरणाची अमंलबजावणी करावी अशी आमची मागणी असल्याचे बाल संरक्षण धोरणातील प्रमुख मुददे* बाल संरक्षण म्हणजे काय?* सुरक्षित आणि विद्यार्थीस्नेही शाळा कशी करता येईल?* बाल संरक्षण तत्व* प्रतिबंधात्मक आणि प्रतिसादात्मक उपाययोजना* शाळेतील विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी पाळावयाचे वर्तन नियम* शाळेतील त्यांच्या संरक्षणासाठी उभारण्याची व्यवस्था, तक्रार निवारण व्यवस्था आणि बाल संरक्षण प्रणाली* या व्यवस्थांना बळकटी आणण्यासाठी प्रशिक्षणाचे नियोजन*  विद्यार्थ्यांच्या हक्क व सुरक्षेसाठी करावयाची कार्यवाही 

 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीsexual harassmentलैंगिक छळ