शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

मुख्यमंत्रीसाहेब...! पीएमपीला थोडा वेळ द्या : पुणेकरांची विनवणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 6:33 PM

सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी हट्ट सोडायला तयार नाहीत. तर लोकार्पणासाठी मुख्यमंत्रीच कशासाठी?

ठळक मुद्देस्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात एकुण ५०० इलेक्ट्रिक बस येणार

पुणे : लोकार्पणासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने नवीन ई-बस तसेच सीएनजी बस मार्गावर येऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना खिळखिळ््या झालेल्या, गळक्या बसमधूनच प्रवास करावा लागत आहे. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी हट्ट सोडायला तयार नाहीत. तर लोकार्पणासाठी मुख्यमंत्रीच कशासाठी? असा सवाल उपस्थित करून प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘मुख्यमंत्रीसाहेब, पीएमपीसाठी थोडा वेळ द्या’, अशी विनवणी करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. पीएमपीच्या ताफ्यातील नऊ मीटर लांबीच्या २५ ई-बस मार्गावर धावत आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात एकुण ५०० इलेक्ट्रिक बस येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील १५० बसपैकी उर्वरीत १२५ बस १२ मीटर लांबीच्या आहेत. त्यापैकी ५० बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. तसेच ११५ सीएनजी बसही मिळाल्या आहेत. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात या बस मार्गावर धावण्यास सुरूवात होईल, असे पीएमपीकडून सांगण्यात आले होते. पण निम्मा ऑगस्ट महिना उलटला तरी या बस अद्यापही मार्गावर येऊ शकलेल्या नाहीत. सीएनजीच्या ७५ हून अधिक बसची नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाली आहे. तर ई-बसच्या १४ बसची नोंदणी झाली असून उर्वरीत बसची प्रक्रियाही लवकरच पुर्ण होईल. त्यामुळे नोंदणी झालेल्या बस तरी मार्गावर आणण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. एकीकडे खिळखिळ्या बसमधून प्रवाशांना धोकायदायकपणे प्रवास करावा लागत आहे. तर दुसरीकडे नवीन बस येऊनही त्या मार्गावर धावत नसल्याने प्रशासन प्रवाशांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे. केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बसचे लोकार्पण व्हावे, या कारणास्तव पदाधिकाऱ्यांकडून पुणेकरांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. ‘आम्ही कोणत्याही दिवशी बस मार्गावर आणण्यासाठी सज्ज असल्याचे अधिकारी सांगत आहेत. याबाबत प्रवाशांच्या गरजांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.------------बसेस नागरिकांच्या घामाच्या कष्टाचा टॅक्सच्या पैशातून आलेल्या आहेत. आणि त्याचा वापर त्यांना करता येत नाही यासारखे दुर्दैव नाही. आलेल्या नवीन बस कोणत्याही उद्घाटनाची वाट न पाहता प्रवाशांसाठी सोडाव्यात. या बस राजकीय अजेंडा राबवण्यासाठी नसून पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित सुरळीत होण्यासाठी आहे.  - संजय शितोळे, सचिव, पीएमपी प्रवासी मंच

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNayana Gundeनयना गुंडे