शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी मंजुषा इथाटे ५० हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 6:05 PM

पुणे महापालिकेच्या त्या मुख्य विधी अधिकारी म्हणून काम पाहतात.

पुणे : महापालिकेकडून देण्यात येणारा टीडीआर हा नेहमीच वादाचा विषय आजवर ठरत आला आहे. त्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने टीडीआर प्रकरणात थेट महापालिकेत सापळा रचून विधी सल्लागार मंजुषा इधाटे यांनाच ५० हजार रुपयांची लाच घेतला सोमवारी दुपारी ४ वाजता रंगेहाथ पकडले.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार मिळाल्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत अवघ्या ४ तासात सापळा कारवाई संपूर्णपणे यशस्वी करण्यात आली.

विधी सल्लागार मंजुषा सतिश इधाटे (वय ५७) असे अटक केलेल्या महिला अधिकार्‍यांचे नाव आहे. या कारवाई पाठोपाठ मंजुषा इधाटे यांच्या कोथरुडमधील घराची झडती सुरु करण्यात आली आहे. टीडीआर प्रकरणाची फाईल अभिप्राय देऊन पुढे पाठविणसाठी तक्रारदार यांनी विधी सल्लागार मंजुषा इधाटे यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी या कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने सोमवारी सकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची तातडीने पडताळणी केली. त्यात त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने पाठोपाठ महापालिकेच्या जुन्या इमारतीतील इधाटे यांच्या कार्यालयाबाहेर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना इधाटे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  उपअधीक्षक सीमा मेहेंदळे, पोलीस निरीक्षक ज्योती पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. इधाटे यांच्या कोथरुडमधील घरी पोलिसांनी सर्च सुरु केला आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWomenमहिलाBribe Caseलाच प्रकरण