cheating with people in the under name of brown rice at Pune | पुण्यात हातसडी (ब्राऊन राईस) च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक
पुण्यात हातसडी (ब्राऊन राईस) च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक

ठळक मुद्देसाधा तांदूळ उकडून ‘ब्राऊन राईस’ म्हणून केली जाते विक्रीपोषक व आरोग्यदायी म्हणून मागणीमध्ये वाढ

पुणे: गेल्या काही वर्षांत हातसडी (ब्राऊन राईस) ची मागणी सर्वसामान्य नागरिकामध्ये वाढत आहेत. ब्राऊन राईस पोषक आणि अधिक आरोग्यदायी असल्याने किमंत देखील दोन ते तीन पट्ट अधिक मिळते. याचाच फायदा घेत सध्या बाजारामध्ये साधा राईस अर्धवट उकडून (बॉईल) करून ब्राऊन साईसच्या नावाखाली विक्री केली जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचे जयराज आणि कंपनीचे संचालक व फेडरेशन ऑफ असोशियशनसऑफ महाराष्ट्र (फाम) चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी सांगितले.
राजेश शहा यांनी सांगितले की, सामान्य लोकात आरोग्याप्रती जागरूकता कमालीची वाढली आहे. त्यामुळे एक विशिष्ट वर्ग ब्राऊन राईसला प्राधान्य देत आहे. परिणामी ब्राऊन राईसची मागणी सुद्धा वाढत आहे. याच संधीचा वापर करून काही कंपन्या चुकीचा फायदा उचलत आहेत. साधा तांदूळ पॉलीश न करता, पुन्हा अर्धवट बॉईल प्रक्रिया करून तोच ब्राऊन राईस म्हणून ग्राहकांच्या माथी मारत आहेत. थोडे उकड्ल्यामुळे तांदळाच्या दाण्यांचा रंग बदलतो व त्याची त्वचाही गुळगुळीत न राहता ओबडधोबड बनते. अनेक प्रकारचे फसवे दावे मोठ्या प्रमाणात कंपन्या करत आहेत. 
ब्राऊन राईस हा मिलिंग करतेवेळी तांदळाचे फक्त बाहेरील आवरण काढल्यामुळे व पॉलीश न केल्यामुळे तांदळाच्या दाण्यांवरील बाहेरील थर तसाच शाबूत राहतो. या थरात तांदळातील सर्वाधिक पोषक तत्वे असतात. ते तसेच राहिल्यामुळे ब्राऊन राईस मधील पोषक तत्वे टिकून राहतात ही वस्तुस्थिती आहे. परंतु सध्या काही कंपन्या ब्राऊन राईस विकताना आमच्या तांदळामध्ये निम्नतम म्हणजे ८ ते १० जीआय असल्याचा दावा करतात. परंतू,तो खोटा असतो. अशा प्रकारे जाहिरात करून चुकीचा माल ग्राहकांना जास्त भावात विकतात. देशातील विविध क्षेत्रातील पाहणीनुसार आणि वेगवेगळ््या लॅबोरेटरीमधील तपासण्यांच्या अहवाला नुसार तांदळाचा जीआय ४० ते ५० पर्यंत आढळतो. तर काही कंपन्या आपला राईस फायबरयुक्त व शुगर फ्री असल्याचाही दावा करतात. परंतू तांदूळ मग तो साधा असो किंवा ब्राऊन त्यामध्ये स्टार्चचे प्रमाण असते. सेवन केल्यावर त्याचे रुपांतर साखरेत होते. त्यामुळे शुगर फ्री हा दावा सपशेल खोटा आहे. तांदूळ अर्धवट बॉईल केलेला असल्यामुळे तो बिगर पॉलीश नाही. शिवाय तांदळाच्या बाहेरील थरातील ब्रान नसल्यामुळे तांदूळ उच्च फायबर युक्त नसतो.
सध्याच्या काळात मधुमेहाच्या (शुगर वाढण्याची) भीती दाखवून फसवणुकीचे प्रकार होत आहेत. ग्राहकांनी खोट्या जाहिरातींना बळी न पडता ब्राऊन राईस खरेदी करताना त्याच्या प्रतीची शहानिशा करूनच खरेदी करावी, असे आवाहन देखील शहा यांनी केले.    


Web Title: cheating with people in the under name of brown rice at Pune
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.