स्वस्तात सोन्याचा मोह पडला ४३ लाख रुपयांना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 02:28 AM2021-05-08T02:28:57+5:302021-05-08T02:29:16+5:30

मुकेश सूर्यवंशीचे कारनामे, आई-वडिलांचीही साथ, लुकआऊट नोटीशीमुळे जाळ्यात

Cheap gold fell to Rs 43 lakh | स्वस्तात सोन्याचा मोह पडला ४३ लाख रुपयांना

स्वस्तात सोन्याचा मोह पडला ४३ लाख रुपयांना

Next

पुणे : स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या मुकेश सूर्यवंशी याने पुण्यातील एका महिलेला तब्बल ४३ लाख ८० हजार रुपयांना गंडा घातला होता. पुणे पोलिसांनी इंटरपोलमार्फत काढलेल्या लुकआऊट नोटिशीमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडू शकला. 
याप्रकरणी बाणेर येथील २८ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादी यांची  सूर्यवंशी याच्याशी जानेवारी २०१८ मध्ये ओळख झाली.  सूर्यवंशीने  आपला सोन्याचा व्यवसाय असून त्यात गुंतवणूक करा, असे सुचविले.  २७ हजार रुपये तोळा दराने सोने घेऊन जादा फायदा मिळवू शकता.

गुंतवणुकीच्या रकमेवर दर २५ दिवसांनी परतावा देण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने नाशिकला जाऊन तो खरंच हा व्यवसाय करतो का, याची खात्री केली. त्याच्या आई-वडिलांना भेटल्या. त्यानंतर मुकेश सूर्यवंशी याच्या बँक खात्यात वेळोवेळी एकूण ४२ लाख ८० हजार रुपये गुंतवले. त्यावर मुकेशने १७ लाख ५९ हजार रुपये परतावा म्हणून देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जुलै २०१८ नंतर परतावा देणे बंद केले. महिलेने त्याचे वडील ईश्वर सूर्यवंशी यांना फोन करून सांगितले. तेव्हा त्यांनी मी आता मीटिंगमध्ये आहे. मला १० लाख रुपये मिळणार आहेत. ती रक्कम मी तुला देतो, सध्या मला ५५ हजार रुपयांची गरज आहे, असे सांगून पैसे बँक खात्यावर पाठविण्यास सांगितले. फिर्यादी यांनी त्यांना ५५ हजार रुपये पाठविले. शेवटी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली.  त्यानुसार पोलिसांनी मे २०१९ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तोपर्यंत मुकेश दुबईला पळून गेला होता. पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस बजावली होती. 

दुबईतून गोव्यात आल्यानंतर अटक
n तीन वर्षे दुबईत राहिल्यानंतर तो मार्च महिन्यात गोव्याला परत आला. पोलिसांनी त्याला विमानतळावरच पकडले. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ६ मार्च रोजी गोवा पोलिसांकडून त्याला ताब्यात घेऊन अटक केली. 
n पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडून सोने अथवा रोख रक्कम हस्तगत करता आली नाही. त्यानंतर त्याला मुंंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Cheap gold fell to Rs 43 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app