भातपिक करपले; पावसाचा फटका आता भातउत्पादकांना बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:17 AM2017-10-23T01:17:03+5:302017-10-23T01:17:07+5:30

भातशेतीचे आगर समजल्या जाणा-या उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण ७२९५३ हेक्टरएवढे भातक्षेत्र आहे. यंदा जवळपास ८० टक्के भातलागवडी झाल्या असून भातपीक समाधानकारक होते.

Chapatti Karepale; Rainfall now comes to rice producers | भातपिक करपले; पावसाचा फटका आता भातउत्पादकांना बसला

भातपिक करपले; पावसाचा फटका आता भातउत्पादकांना बसला

googlenewsNext

पुणे : भातशेतीचे आगर समजल्या जाणा-या उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण ७२९५३ हेक्टरएवढे भातक्षेत्र आहे. यंदा जवळपास ८० टक्के भातलागवडी झाल्या असून भातपीक समाधानकारक होते. मात्र, परतीच्या पावसाचा फटका आता भातउत्पादकांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास करपा रोग पडल्याने हिरावून घेतला आहे. शेतच्या शेत या रोगामुळे भुईसपाट झाले आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांत राहणाºया भातउत्पादक शेतकºयांकडून दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर पावसाच्या पाण्यावर अबलंबून असणारी भातशेती केली जाते. पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, हवेली व पुरंदर या तालुक्यांत ७२९५३ एवढे एकूण भातक्षेत्र आहे. त्यापैकी यंदा ८० टक्के क्षेत्रावर भातलागवडी पूर्ण झाल्या आहेत. भातशेती हेच या भागातील शेतकºयांच्या उदनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याने या भागात राहणाºया हजारो लोकसंख्येच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाते. भातउत्पादनाचे क्षेत्र हे प्रामुख्याने जिरायती क्षेत्र असल्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती काही वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडू लागली आहे.
यावर्षी मात्र पावसाने भाताला चांगली साथ दिली होती. शेतकरी यंदा चांगला उतारा मिळणार, म्हणून खूश होता. मात्र दिवाळीपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा परिणाम आता जाणवू लागला आहे. हळव्या जातीच्या भाताचा पावसाने दाणा सडून नुकसान झाले, तर आता भातावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी डोलत असलेली भातशेती अचानक करपून जात आहे. त्यामुळे शेतकरी गडबडला आहे.
>पिरंगुट : यंदा समाधानकारक पडलेल्या पावसाने मुळशी तालुक्यात भातपिके जोमात आली. परंतु काढणीच्या वेळी पडलेल्या परतीच्या पावसाने कहर केला. त्यातच भातपिकांवर पडलेल्या करपा रोगामुळे शेतकºयांवर तयार झालेले भातपिक हातून जाण्याच्या मार्गावर आहे.
मागील आठवड्यात परतीचा पाऊस पडल्याने शेतात पाणी साचून आहे तसेच गेले दोन दिवस तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. त्यात भातपिकांवरकरप्याची लागण झाल्याने भात कापावे की नको, असा प्रश्न उभा राहिला आहे. हाती आलेले भातपिक गेल्याने शेतकºयांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
अनेक शेतकरी काढणीवाचून चाललेले पीक हॉलर मशिनने काढत आहेत. परंतु त्यासाठी लागणारा खर्च जास्त असल्याने तसेच जनावरांना पेंढ्या मिळत नसल्याने काही शेतकरी भात कापून बांधावर अथवा खडकावर उथळ जागी वाळकी घालीत आहे. काही शेतकरी ढगाळ वातावरण जाण्याची वाट पाहत आहेत.
आंदगावातील आटाळवाडी येथील अनिल आटाळे, मोहन भुकेले, विक्रम आटाळे, नामदेव आटाळे, बबन आटाळे, सदाशिव आहेर, हरिभाऊ आटाळे, बबन जोगावडे, दत्तात्रय आटाळे, लक्ष्मण शेलार, श्रीपती शेलार, प्रभाकर आटाळे, राजू भिकोले, दत्तात्रय शेडगे, ज्ञानोबा आटाळे यांच्या शेतातील पिकांवर करप्याची लागण झाली असून शेतकºयांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.

Web Title: Chapatti Karepale; Rainfall now comes to rice producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.