शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या हवामानाने संसर्गजन्य आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 02:31 IST

लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावी काळजी : हृदयविकारग्रस्तांनी राहावे सावधान !

पुणे : दिवसभरात कधी कडक ऊन, कधी गडद ढग दाटून येणे, अचानक सुटलेली थंड हवा या सगळ्यात भर म्हणजे अवचित पावसाची सर येणे, अशा लहरी वातावरणाने लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याच्या समस्या मात्र वाढल्या आहेत. सर्दी, खोकला, जुलाब, डेंगी आणि मलेरिया यासारख्या संसर्गजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बेभरवशी वातावरणातील बदलामुळे खासकरून थंडहवेच्या झोताने ज्येष्ठांच्या हातापायांना मोठ्या प्रमाणात कंप जाणवू लागला आहे.

सकाळी थंडी, दुपारी उष्मा आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस असा तिन्ही ऋतूंचा अनुभव आता एकाच दिवशी मिळत आहे. मात्र, याचा परिणाम ज्येष्ठांसोबत लहान मुलांना सहन करावा लागत आहे. ढगाळ हवामानामुळे पुन्हा दमा, सांधेदुखी, गुडघादुखी अशा दुखण्यांनी डोके वर काढल्याने ज्येष्ठांच्या डोकेदुखीत आणखी भर पडली आहे. ढगाळ हवामान आणि धुक्याने हवामानाचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला असून, साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. खासकरून लहान मुलांच्या आरोग्यावर याचा होणारा परिणाम, याविषयी बालरोग व शिशुतज्ज्ञ डॉ. सचिन आठमुठे यांनी सांगितले, की बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप, खोकला, सारखे विषाणुजन्य आजार वाढले आहेत. अनेकांना डेंगीची लक्षणे दिसून आली आहेत. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर एक ते पाच वर्षांमधील मुलांना ‘हँड, फूट अँड माऊथ डिसीज’ची लागण झालेली आहे. त्याचप्रमाणे ढगाळ हवामानामुळे बालदम्याचे रुग्ण वाढले असून पाणीबदलाने उलट्या आणि जुलाबाने लहान मुले त्रस्त आहेत.

काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीने वातावरण कमालीचे बदलले आहे. अशा बेभरवशी वातावरणामुळे हवामानाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. सध्या सकाळी थंडी जाणवते, तर दुपारी उन्हाचा कडाका सोसावा लागत आहे.रात्री उकाडा जाणवतो, तर पहाटे गारवा; त्यामुळे एकाच वेळी विविध ऋतूंचा सामना करावा लागत आहे. अशा वातावरणाचा त्रास हृदयविकाराच्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना अशा वातावरणात प्रामुख्याने न्युमोनियासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. सामान्य लोकांच्या तुलनेत हृदयविकाराच्या रुग्णांना याची लागण लगेच होते. वय वर्षे ६०च्या पुढील आणि १५ वर्षांखालील मुलांमध्ये श्वासोच्छ्वासाच्या आणि हृदयविषयक तक्रारी दिसू लागतात. यावर वेळेवर लसीकरण करून घेणे आणि कुठल्याही प्रकारच्यासर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष न करणे, याची काळजी त्यांनी घ्यावी,असे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत कोकणे सांगतात.काय करावे ? संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांपासून दूर राहावे1 अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचीही भीती कायम आहे. साठलेल्या पाण्यामुळे डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण वाढण्याचा धोका वाढताना दिसत आहे. यामुळे किरकोळ ताप किंवा सर्दीकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच उपचार घेऊन स्वच्छतेला महत्त्व द्यावे लागणार आहे.

2दिवाळी म्हटले, की घरोघरी गोडधोड पदार्थांचीरेलचेल असते. काहींना या तेलकट पदार्थांनी घसादुखीचा त्रास जाणवतो; मात्र त्याकडेदुर्लक्ष केले जाते. अशा प्रक ारचे दुर्लक्ष आरोग्याकरिता धोकादायक ठरू शकते.वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. सर्दीमुळे अनेकांनासायनसने हैराण केले आहे. तर, लहान मुलांच्या कानाचे दुखणे वाढू लागले आहे. कानात पाणी साठणे, कानात पू होणे अशा प्रकारचा त्रास त्यांना होत आहे. विषाणुजन्य आजाराने नाक, कान आणि घशाच्या आजारांत वाढ झालेली आहे.- डॉ. समीर जोशी (कान-नाक-घसा तज्ज्ञ)

टॅग्स :Healthआरोग्यPuneपुणे