शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

विसर्जनादिवशी '' पीएमपी '' संचलनात बदल : दिवसभरात २५ टक्के फेऱ्या रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 7:00 AM

मिरवणुकीमुळे दि. १२ सप्टेंबर रोजी काही रस्ते बंद असल्याने या मार्गावरून बस संचलन बंद ठेवणार आहे.

ठळक मुद्देडेक्कनकडून टिळक चौकातून जाणाऱ्या बस बंदच राहणार संचलन सायंकाळनंतर एसएनडीटी चौकातून सुरू करणार शहराच्या मध्यभागातून जाणारे काही मार्ग बंद ठेवणार

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)कडून शहरातील बस संचलनामध्ये बदल केला आहे. मिरवणुकीमुळे १२ सप्टेंबर रोजी काही रस्ते बंद करणार असल्याने या मार्गावरून बस संचलन बंद ठेवणार आहे. तसेच काही बसस्थानकांवरील संचलनही बंद ठेवणार आहे. विसर्जन मिरवणुकीमुळे लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता हे प्रमुख सकाळपासूनच वाहतुकीला बंद करण्यात येतात. त्यामुळे या रस्त्यावरील बस वाहतुक मिरवणूक संपेपर्यंत बंदच राहणार आहेत. तसेच टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता व लाल बहाद्दुर शास्त्री रस्ता हे रस्तेही टप्याटप्याने बंद केले जातात. त्यानुसार या मार्गावरील वाहतुक बंद करणार आहे.

डेक्कनकडून टिळक चौकातून जाणाऱ्या बस बंदच राहणार आहे. डेक्कन बसस्थानक बंद ठेवणार असून त्याऐवजी खंडोजी बाबा चौकातून बस संचलन सुरू राहील. हे संचलन सायंकाळनंतर एसएनडीटी चौकातून सुरू करणार आहे. खंडोजी बाबा चौकातून कर्वे रस्ता, म्हात्रे फुल, सिंहगड रस्ता या मार्गे बस स्वारगेट व कात्रजच्या दिशेने जातील. तसेच पुणे स्टेशनहून येणाऱ्या बस नेहरू रस्त्याने स्वारगेटकडे वळविल्या जातील. शहराच्या मध्यभागातून जाणारे काही मार्ग बंद ठेवणार आहेत. स्वारगेट येथून होणारे पीएमपीचे संचलन बंद ठेवणार आहे. त्याऐवजी चार ठिकाणांहून बस सोडण्यात येतील.--विसर्जन मिरवणुकीदिवशीचे नियोजनतात्पुरते स्थानक                                                     मार्गलक्ष्मी नारायण चौक                                        सातारा रस्त्याने कात्रज, मार्केटयार्डपर्वती पायथा  बस थांबा                                     सिंहगड रस्त्याने जाण्यासाठीवेगा सेंटर (स्वारगेट आगाराजवळ)               सोलापूरमार्गे पुलगेट, हडपसर, कोंढवासाठीवेगा सेंटर (स्वारगेट आगाराजवळ)               भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठसाठीखंडोजी बाबा चौक                                       कोथरूड, कर्वेनगर, वारजे माळवाडी, कोंढवा गेट, गोखलेनगरसाठीमनपा भवन मुख्य बसस्थानक                   भोसरी, चिंचवड, निगडी, देवाची आळंदी, विश्रांतवाडी, पाषाण, बालेवाडी,                                                                      सांगवी, पिंपळे गुरव, तळेगाव दाभाडे, प्राधिकरणकाँग्रेस भवन बसस्थानक                            कर्वेनगर, माळवाडी, कोंढवा गेट, कोथरुड डेपोमनपा नदीकाठी बसस्थानक                     बालेवाडी, पाषाण, सुतारवाडीडेंगळे पुल स्थानक                                   लोहगाव, वडगाव शेरी, मुंढवा गाव, केशवनगर--- लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता-सकाळपासूनच संचलन बंद- टिळक रस्ता, लाल बहाद्दुर शास्त्री रस्ता-टप्प्याटप्याने संचलन बंद.....दिवसभरात २५ टक्के फेऱ्या रद्द होणारविसर्जन मिरवणुकीमुळे अनेक नियमित बसफेऱ्या रद्द होणार आहेत. प्रामुख्याने शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता व लक्ष्मी रस्तावरील मार्ग बंद राहू शकतात. तसेच सांयकाळनंतर शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक मार्गांवरील गर्दी वाढते. त्याचा बससंचलनावर परिणाम होतो. बस वेळेवर न पोहचल्याने फेऱ्या रद्द कराव्या लागणार आहेत. त्यामुळे दिवसभरात सुमारे २५ टक्के फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे