पुणे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतुकीत बदल; देखावे पाहण्यासाठी गर्दीमुळे रस्ते राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 11:56 AM2023-09-23T11:56:02+5:302023-09-23T11:56:27+5:30

लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता तसेच अंतर्गत रस्ते सायंकाळनंतर बंद केले जाणार असल्याने नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे...

Changes in traffic in central areas of Pune city; Roads will be closed due to crowd to see the sights | पुणे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतुकीत बदल; देखावे पाहण्यासाठी गर्दीमुळे रस्ते राहणार बंद

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतुकीत बदल; देखावे पाहण्यासाठी गर्दीमुळे रस्ते राहणार बंद

googlenewsNext

पुणे : गणेशोत्सवात शनिवारपासून शहरातील गणपती दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता तसेच अंतर्गत रस्ते सायंकाळनंतर बंद केले जाणार असल्याने नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे.

घरगुती गणपती आणि गौरी विसर्जनानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यास गर्दी उसळते. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दि. २३ ते २७ सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहनेवगळता सर्व वाहनांसाठी सायंकाळी पाच ते गर्दी ओसरेपर्यंत मुख्य रस्ते बंद असतील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

बंद रस्ता -

लक्ष्मी रस्ता : हमजेखान चौक ते टिळक चौक

डुल्या मारुती चौकातून दारूवाला पूलमार्गे, हमजेखान चौकातून शंकरशेठ रस्तामार्गे तसेच सोन्या मारुती चौकातून मिर्जा गालीब रस्त्याने मंडईमार्गे स्वारगेट

बंद रस्ता -

शिवाजी रस्ता : गाडगीळ पुतळा ते जेधे चौक

पर्यायी मार्ग -

शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाण्यासाठी जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता किंवा टिंबर मार्केटमार्गे स्वारगेट

बंद रस्ता-

बाजीराव रस्ता : पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक

पर्यायी मार्ग - टिळक रस्ता, टिळक चौक, केळकर रस्ता

बंद रस्ता-

टिळक रस्ता : मराठा चेंबर्स ते हिराबाग चौक

पर्यायी मार्ग-

जेधे चौक, नेहरु स्टेडियम

बंद रस्ता - घोरपडी पेठ ते राष्ट्रभूषण व हिराबाग चौक

पर्यायी मार्ग -

शिंदे आळी, भिकारदास पोलिस चौकी, खजिना विहीरमार्गे टिळक रस्ता

इतर बंद रस्ते

दिनकर जवळकर पथ ते पायगुडे चौक, गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक, पानघंटी चौक ते गंज पेठ पोलिस चौकी

वाहने लावण्यास बंदी

शिवाजी रस्त्यावर जिजामाता चौक ते मंडई, मंडई ते शनिपार, शनिपार ते फुटका बुरूज आणि अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या दरम्यान वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: Changes in traffic in central areas of Pune city; Roads will be closed due to crowd to see the sights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.