शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

परिवर्तन! एकेकाळी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या बारामती तालुक्यातील 'सायंबाच्यावाडी'त चक्क बोटींग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 6:46 PM

बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यातील सायंबाचीवाडी एक दुष्काळी गाव. त्यामुळे पाण्यासाठी वणवण ठरलेलीच..

बारामती: बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यातील सायंबाचीवाडी एक दुष्काळी गाव. कायमच पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने पाण्यासाठी वणवण ठरलेली आहे. त्यामुळे या गावातील पुरूष आणि महिलांच्या डोक्यावरील हंडा कधी उतरलाच नव्हता. मात्र २०१८-१९ मध्ये सायंबाचीवाडी एकजुटीने पाणी फाऊंडेशनच्या जल साक्षर चळवळीमध्ये उतरली. बारामती तालुक्यातून सायंबाच्यावाडीने प्रथम क्रमांक पटकावला. फक्त बक्षिसासाठी नाही तर आपली कायम दुष्काळी ही ओळख पुसण्यासाठी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ एकत्र आले. आणि परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. 

‘गाव करील ते राव काय करील’ या म्हणीचा प्रत्यय सायंबाचीवाडीमध्ये गेल्यावर अनुभवास येतो. कायम दुष्काळाच्या झळा सोसलेल्या सायंबाच्यावाडीमध्ये आता पाझर तलावात बोटींग करता येईल एवढे पाणी भरले आहे. जलसंधारणाची झालेली कामे आणि वरूणराजाने भरभरून दिलेले दान यामुळे सायंबाचीवाडी पाणीदार झाली आहे.

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावाच्या मध्यभागी असणाऱ्या लेंडी पिंपरी या सर्वात मोठ्या तलावातील गाळ उपसला होता. २०२० साली संपूर्ण जिल्ह्यामध्ये अक्षरश: ढगफुटीसारखा पाऊस झाला. सायंबाच्यावाडीमध्ये देखील पावसाने सगळे विक्रम मोडले. लेंडी पिंपरी पाझर तलाव व गावाच्या भोवती असणारे ४ ते ५ तलाव भरून वाहू लागले. जलसंधारणाच्या कामामुळे पाझर तलावाच्या भोवतालची शेकडो एकर शेती ओलिताखाली आली.

लेंडी पिंपरी तलाव बनला पर्यटनस्थळ सायंबाचीवाडीचे सरपंच प्रमोद जगताप यांनी सांगितले, शहरामध्ये नागरिकांना फिरायला, लहान मुलांना खेळायला बाग, उद्याने असतात. मात्र ग्रामीण भागात विरंगुळ्यासाठी ग्रामस्थांना हक्काचे ठिकाण नसते. त्यामुळे गावच्या मध्यभागी असणाऱ्या तलावाचे सुशोभीकरण करण्याचा निश्चय केला. ग्रामस्थांनी देखील ही कल्पना उचलून धरली. तलावाच्या भराव्यावर ४०० मिटर लांबीचे दोन ‘मॉर्निंग वॉक ट्रॅक’ तयार केले. ट्रॅकच्या कडेने हिरवेगार लॉन तयार करण्यात आले. जिल्हा परिषदेकडून विशेष निधी अंतर्गत तलावात विहार करण्यासाठी बोट मंजूर केली गेली. तलावाच्या परिसरात पथदिवे, बैठक व्यवस्था आदींची सोय करण्यात आली.आता गावातील अबाल-वृद्ध येथे फिरायला जात आहेत.

मागील आठवर्षांपासून बारामती तालुक्यामध्ये जलसंधारणाची विविध कामे सुरू आहेत. त्यामध्ये ओढा खोलीकरण, नाला खोलीकरण, साठवण बंधारे यांचा समावेश आहे. बारामती तालुक्याच्या जिरायती पट्टा पाणीदार होऊ लागला आहे.

- अशोक कोकरे,शाखा अभियंता,लघू पाटबंधारे विभाग.  

टॅग्स :BaramatiबारामतीWaterपाणीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाdroughtदुष्काळ