चंद्रकांत पाटलांना स्वप्न बघण्याचा छंद! जयंत पाटलांचा जोरदार चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 02:59 PM2021-05-28T14:59:56+5:302021-05-28T15:00:09+5:30

सर्वजण झोपेत असताना महाविकास आघाडी सरकार पडेल अशी भविष्यवाणीही त्यांनी केली होती.

Chandrakant Patil's hobby of dreaming! Jayant Patil | चंद्रकांत पाटलांना स्वप्न बघण्याचा छंद! जयंत पाटलांचा जोरदार चिमटा

चंद्रकांत पाटलांना स्वप्न बघण्याचा छंद! जयंत पाटलांचा जोरदार चिमटा

Next

पुणे: कोरोना, मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने आरोप - प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. विरोधक सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर एकही टीकेची संधी सोडताना दिसत नाही. यात भाजपमधील चंद्रकांत पाटील तर आघाडीवर आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सर्वजण  असतानाच हे सरकार  जाईल असे विधान करून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडून दिली होती. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना स्वप्न पडण्याचा छंद असेल तर त्याला मी काहीच करून शकत नाही अशा खास शैलीत जोरदार टोला लगावला आहे. 

पुण्यात साखर कारखान्याच्या संदर्भात झालेल्या बैठकीनंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य करताना चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.पाटील म्हणाले, महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे. मात्र अशी वक्तव्य पाटील हे नेहमीच करत असतात. सर्वजण झोपेत असताना सरकार पडेल अशी भविष्यवाणीही त्यांनी केली होती. यावर त्यांना स्वप्न पडण्याचा छंद असेल, तर त्यावर काय बोलणार अशा शब्दात जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर चिमटा काढला.


केंद्रात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती पाहून अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, याचं कारण जगजाहीर आहे. राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असं चंद्रकांत पाटील म्हणतात. केंद्राचा नियम हा प्रत्येक राज्यालाही लागू होतो. त्यामुळे महाराष्ट्रतही अधिवेशन होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊन वाढवण्याबाबत दोन दिवस परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही यावेळी सांगितले. राज्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येतानाचे चित्र दिसून येत आहे. पॉझिटिव्हीटी रेटही खाली गेले आहेत. पण हा रेट पूर्णपणे कमी होत नाही. तोपर्यंत संकट अजून टळले असे म्हणता येणार नसल्याचे ते म्हणाले आहेत.

Web Title: Chandrakant Patil's hobby of dreaming! Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.