शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

चंद्रकांत पाटील यांचे ‘जगन्नाथ जोशी’ होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 11:27 AM

पुण्याने नाकारला होता बाहेरचा उमेदवार..

ठळक मुद्देअन्य एकाही पक्षाने पुण्यात आतापर्यंत लोकसभा किंवा विधानसभेला बाहेरचा उमेदवार नाही दिलेला

पुणे :शहरात बाहेरचा उमेदवार देण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच पहिला व एकमेव राजकीय पक्ष आहे. लोकसभेसाठीही भाजपाने एकदा पुणे लोकसभा मतदारसंघातून याच पद्धतीने पुण्यातील उमेदवारांना डावलून कर्नाटकाचे जगन्नाथ जोशी यांना उमेदवारी बहाल केली होती; मात्र ते पराभूत झाले. अन्य एकाही राजकीय पक्षाने पुण्यात आतापर्यंत लोकसभा किंवा विधानसभेला पुण्याबाहेरचा उमेदवार दिलेला नाही.भाजपाने कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना डावलून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिथून उमेदवारी जाहीर केली आहे. पाटील मूळचे कोल्हापूरचे आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले आहेत. पुण्याशी थेट राजकीय किंवा सामाजिक संबंध नसताना त्यांना विद्यमान आमदाराला डावलून उमेदवारी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.सन १९८४मध्येही भाजपाने पुणे लोकसभा मतदारसंघातून कर्नाटकाचे असलेले जगन्नाथ जोशी यांना उमेदवारी दिली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभेसाठी भाजपाने तोच प्रयोग केला आहे. कोथरूड मतदारसंघ हा युती असताना शिवसेनेचा बालेकिल्ला होता. सन २०१४मध्ये युती तुटल्यानंतर तो भाजपाने काबीज केला. प्रा. कुलकर्णी या स्थानिक उमेदवार निवडून आल्या. त्या महापालिकेत नगरसेवक होत्या. मागील ५ वर्षांत त्यांनी मतदारसंघाची चांगली बांधणी केली. त्यातून हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. तो सुरक्षित वाटल्यामुळेच भाजपाने व खुद्द पाटील यांनीही त्यांच्यासाठी याच मतदारसंघाची निवड केली असल्याचे दिसते आहे. दरम्यान, पाटील यांच्या उमेदवारीला त्यांच्याच पक्षातून निनावी विरोध होताना दिसतो आहे. अन्य राजकीय पक्षांनाही या संदर्भात भाजपावर टीका केली आहे. ..............पुण्यातून बाहेर गेलेले उमेदवार१९७१ - डॉ. बाबा आढाव - खेड लोकसभा (जि. पुणे)२००९ - शरद पवार - माढा लोकसभा (जि. सोलापूर)२०१९ - रोहित पवार - कर्जत-जामखेड विधानसभा (जि. नगर)

राज्यातील उमेदवार १९६३ - यशवंतराव चव्हाण - नाशिक लोकसभा१९९६ - प्रमोद महाजन - मुंबई ईशान्य लोकसभा२०१५ - नारायण राणे - वांद्रे पूर्व विधानसभा

राज्याबाहेर निवडणूक लढवणारे उमेदवारअटलबिहारी वाजपेयी (लखनौ-उत्तर प्रदेश, ग्वाल्हेर-मध्य प्रदेश, लोकसभा), पी. व्ही. नरसिंह राव (रामटेक - लोकसभा), जॉर्ज फर्नांडिस (मुंबई, मुझफ्फरपूर-बिहार, नालंदा-बिहार लोकसभा), सोनिया गांधी आणि सुषमा स्वराज (बेल्लारी लोकसभा, कर्नाटक) नरेंद्र मोदी (वाराणसी लोकसभा, उत्तर प्रदेश), राहुल गांधी (वायनाड, केरळ)

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा