पुणे : कोरोना आपत्तीत पुणे शहरात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या कामाला मी १०० पैकी १०० मार्क देतो असे सांगून पाटील यांनी, पालकमंत्री अजित पवार यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. पवार यांचा स्वभाव पाहता, कोरोना आपत्तीत त्यांनी खाड खाड निर्णय घेणे अपेक्षित होते पण तसे त्यांनी केले नसल्याचे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात केलेल्या कामाची व कोरोना आपत्तीत केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, कोरोनाच्या आपत्तीत देशामध्ये नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळेत लॉकडाऊन जाहीर केले. अर्थव्यवस्था सावरण्यासाठी २०.९७ लाख कोटींचे पॅकेज दिले. महाराष्ट्र राज्याला १६०० कोटी केवळ मजुरांच्या योजनेसाठी दिले. पण महाराष्ट्र शासनाने काहीही केले नाही. केवळ रेल्वे तिकिटातील १५ टक्के रक्कम दिली. देशातील इतर राज्यांनी केंद्र सरकारचे पॅकेज येण्यापूर्वीच स्वत:चे कोरोना आपत्तीकरिता पॅकेज दिले, तसे महाराष्ट्र सरकारने अद्याप काहीच केलेले नाही.
चंद्रकांतदादांनी पुण्याच्या महापौरांना दिले शंभरपैकी शंभर मार्क तर 'पालकमंत्र्यां'ना केले 'नापास'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 19:24 IST
अजित पवार यांचा स्वभाव पाहता, कोरोना आपत्तीत त्यांनी खाड खाड निर्णय घेणे अपेक्षित होते पण तसे त्यांनी केले नाही..
चंद्रकांतदादांनी पुण्याच्या महापौरांना दिले शंभरपैकी शंभर मार्क तर 'पालकमंत्र्यां'ना केले 'नापास'
ठळक मुद्देअर्थचक्र गतीमान करण्यासाठी मोदी सरकारने घेतले महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारची आतापर्यंत सुमारे ४२ कोटी गरजूंना ५३,२४८ कोटी रुपयांची मदत