शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता! उन्हाळ्यात टाळा उष्माघात, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 09:34 IST

भरउन्हात महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर जवळपास ६०० नागरिकांना उष्माघाताचा त्रास तर १२ हून अधिक नागरिकांचा मृत्यू

पुणे : आपल्या शरीराचे नाॅर्मल तापमान हे ३७ अंश डिग्री सेल्सिअस इतके असते; परंतु जर त्यापेक्षा ते वाढले तर घाम येताे आणि थरीर थंड होण्याची प्रक्रिया सुरू होते; परंतु शरीरातील पाणी संपले तर घाम येणे बंद हाेऊन ताेंडाला काेरड पडून उष्माघाताची शक्यता वाढते. त्यासाठी उन्हात जाताना काही गाेष्टींची काळजी घेणे गरजेचे असल्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

खारघरमध्ये भरउन्हात महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर जवळपास ६०० नागरिकांना उष्माघाताचा त्रास झाला व त्यापैकी १२ हून अधिक नागरिकांचा मृत्यूही झाला. बहुतेकांनी उन्हातून आल्यावर थंड पाणी पिल्यानंतर त्यांना हा त्रास झाला असे बाेलले जात आहे. यावरून उष्माघात किती जीवघेणा ठरू शकताे, ही बाब समाेर आली आहे. म्हणून या उन्हाळ्यात जर स्वत:चा बचाव करायचा असेल तर काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे डाॅक्टर सांगतात.

यंदा मार्च महिन्यापासूनच राज्यात उष्णता वाढली आहे. राज्यातील सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस व त्यापुढे जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे उष्माघाताचे रुग्णही वाढले आहेत. राज्यात मार्च ते १३ एप्रिलदरम्यान उष्माघाताचे ३५७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक संशयित रुग्ण मुंबई उपनगर, नंदुरबार आणि उस्मानाबाद येथील आहेत, तर पुण्यातील दाेन संशयित रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसला तरी ही बाब गंभीर आहे. राज्याच्या साथराेग विभागाने ही माहिती दिली आहे.

काय काळजी घ्याल?

- वाढत्या तापमानात कष्टाची कामे करणे टाळावे.

- उष्णता शोषूण घेणारे कपडे घालावेत.- सावलीत बसून भरपूर पाणी प्यावे.

जाेखीम काेणाला?

- ६५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती- ० ते ५ वर्षे वयोगटातील मुले, गर्भवती माता, मधुमेह, हृदयविकाराचे रुग्ण- अतिउष्ण वातावरणामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती यांना उष्माघाताची जाेखीम आहे.

कारणे 

- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे- कारखान्यांच्या बॉयलर रूममध्ये काम करणे- काच कारखान्यातील कामे- घट्ट कपड्यांचा वापर

लक्षणे 

- पुरळ/घामाेळे- उष्णतेने स्नायूमध्ये पेटके येणे- पाय, घोटा आणि हातांना सूज- थकवा येणे, बेशुद्ध होणे

उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता

शरीराचे तापमान जर ३६.८ अंश सेल्सिअसच्यापुढे गेले तर शरीरातील इतर क्रियांवर परिणाम हाेताे. जर हे तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले, तर मग मेंदूतील तापमान नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेवर परिणाम हाेताे. यावेळी घाम येऊन शरीरातील पाणी संपले, तर मग लघवी बंद हाेते. डाेळ्यापुढे अंधारी येते, मेंदूचा रक्तपुरवठा मंदावताे. अशावेळी उष्माघात हाेऊन वेळेवर उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता वाढते. - डाॅ. अविनाश भाेंडवे, माजी अध्यक्ष, आयएमए

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यTemperatureतापमानWaterपाणीHeat Strokeउष्माघात