शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात अतिवृष्टीची शक्यता; खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 19:01 IST

सुरक्षेच्या दृष्टीने हे आवाहन करत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितले

पुणे : राज्यासहित पुणे जिल्ह्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागानेही पुण्याला रेड अलर्ट दिला आहे. तसेच हवामान विभागाने पुढील दोन दिवसात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पर्यटन स्थळांनाही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यातच पावसामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही दरड कोसळणे, झाडपडी, घरे कोसळणे, अपघाताच्या अशा घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. 

 उद्यापासून दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असून त्याच अनुषंगाने आता पुणे पालिका प्रशासन देखील सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्वाच खासगी कंपनी आणि आयटी कंपन्यांना त्यांच्या कर्मचारी वर्गाला वर्क फ्रॉम होम देण्याच आवाहन केलं आहे . हवामान विभागाने उद्या आणि परवा पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे, त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हे आवाहन करत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितला आहे. सिंहगड बंद ठेवा 

पुण्यात सुरु असलेल्या पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या ९ किमीच्या मार्गाला दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना १६ जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे. असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आता वनविभागाच्या या मागणीवर काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाRainपाऊसWaterपाणीDamधरणAccidentअपघात