शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत कुलदैवत खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्सव: गडावरून काढण्यात आला तेलहंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 19:55 IST

मंगळवारी (दि १५) मार्गशीर्ष प्रतिपदेला जेजुरी गडावर देवाची घटस्थापना होऊन देवाच्या उपासनेला सुरूवात झाली

ठळक मुद्देजेजुरी गडावर खंडोबा मंदिरासमोर तेलहंड्याचे पूजन करून आरती

जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्सव अतिशय धार्मिक वातावणात जेजुरी गडावर सुरु असून मार्गशीर्ष पंचमीला पारंपारिक पध्दतीने वाजत गाजत सायंकाळी गडावरून तेल हंडा काढून जेजुरी शहरात मानकरी व भाविकांनी अर्पण केलेल्या तेलाने श्री खंडोबा व म्हाळसा देवीला तेलवण करून हळद लावण्यात आली आहे.

मंगळवारी (दि १५) मार्गशीर्ष प्रतिपदेला जेजुरी गडावर देवाची घटस्थापना होऊन देवाच्या उपासनेला सुरूवात झाली. मार्गशीर्ष पंचमीला देवाला तेलवण व हळद लावली जाते. त्यानिमित्ताने शनिवारी (दि १९) सायंकाळी साडे सहा वाजता जेजुरी गडावरून गुरव,कोळी,वीर घडशी या पुजारी सेवक वर्गाच्या वतीने पारंपारिक पध्दतीने तेलहंडा काढण्यात आला. जेजुरी गडावर खंडोबा मंदिरा समोर या तेलहंड्याचे पूजन करून आरती करण्यात आली. तेल हंडा डोक्यावर घेवून, घडशी समाजाच्या वतीने सनई चौघडा वाजवीत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी विश्वस्त,पुजारीसेवक वर्ग,मानकरी ग्रामस्थ देवसंस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.                                                     जेजुरी गडावरून वाजत गाजत तेल हंडा गावाच्या चावडीत आणण्यात आला. चावडीत गावातील सर्व मानकऱ्यांचे नाव पुकारून हंड्यात तेल अर्पण करण्यात आले. मानाचे तेल अर्पण करून तेल हंडा गडावर नेण्यात आला. शेजारतीला मानकरी व भाविकांनी अर्पण केलल्या तेलाने देवाला अंघोळ घालण्यात आली. व श्री खंडोबा व म्हाळसा देवाला हळद लावण्यात आली. 

टॅग्स :JejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्रा