शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या कौलामुळे राष्ट्रवादीपुढे आव्हान

By admin | Updated: June 23, 2014 22:42 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असूनही एका सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारली.

पुणो : हवेली आणि मुळशी या दोन मतदारसंघांच्या विभाजनातून निर्माण झालेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असूनही एका सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारली. शहरी भागात पुण्यातील जुन्या पेठांमधून आलेला वर्ग मोठय़ा प्रमाणात आहे. पारंपरिक मानसिकता झुगारून  नवे चित्र निर्माण करण्याची क्षमता असलेल्या या वर्गावर भावी उमेदवारांची भिस्त असेल. 
7 वर्षापूर्वी निर्माण झालेल्या या मतदारसंघात ग्रामीण पाश्र्वभूमी असलेली 43 गावे, वाडय़ा-वस्त्यांचा समावेश आहे. शहरी भागात 18 वॉर्ड म्हणजे 9 प्रभाग आहेत.  गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादीचे 12, मनसेचे 4, सेना-भाजपाचे प्रत्येकी 1 नगरसेवक निवडून आले. मनसेचे आमदार रमेश वांजळे यांचे अकस्मात 
निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या प}ी 
हर्षदा या मनसेकडून न लढता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर उभ्या राहिल्या. त्यांना भाजपाचे  भीमराव तापकीर यांच्याकडून हार पत्करावी लागली.
 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असूनही दोन वेळा हा मतदारसंघ त्यांच्या  हातातून निसटला. या मतदारसंघात विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हाही पक्षांतर्गत धुसफूस होतीच. त्यामुळे रमेश 
वांजळे अनपेक्षिपणो निवडून 
आले होते. राष्ट्रवादीच्याच काहींनी मदत केली. 
लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघाच्या काही भागांत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात नवख्या महादेव जानकर यांना आघाडी मिळाली होती. दोन्ही काँग्रेसची आघाडी असली, तरी वर्षानुवर्षे असलेल्या स्थानिक वादावादीतून आघाडीचा धर्म खरोखर पाळला जातो की नाही, हे तपासावे लागेल. अप्रत्यक्ष बंडाळी रोखण्याचे आव्हान मोठे आहे. मनसेच्या 
रूपाने तिरंगी लढत होण्याची 
शक्यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा कोणताही धोका न पत्करता ज्याला संधी मिळेल त्याच्यासाठी एकदिलाने काम करण्याच्या आणाभाका घेणो सहा महिन्यांपासून सुरू केले आहे.  
 भाजपाकडून विद्यमान आमदार भीमराव तापकीर हे पुन्हा इच्छुक आहेतच. मतदारसंघ शिवसेनेकडे यावा, यासाठी विलास मते, राजाभाऊ रायकर प्रयत्नशील आहेत. 
मनसे पुन्हा एकदा ताकद लावण्याचा प्रय} करेल. वसंत मोरे, राजाभाऊ लायगुडे या पक्षातर्फे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीमधील इच्छुकांची संख्या यापूर्वीच्या दोन निवडणुकांसारखीच लक्षणीय आहे. काका चव्हाण, दिलीप बराटे, 
विकास दांगट पाटील, दत्ता धनकवडे हे इच्छुक आहेत.( प्रतिनिधी)