शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीपुढे बंडखोरीचे आव्हान

By admin | Updated: September 26, 2014 05:30 IST

शिवसेना-भारतीय जनता पक्षातील युती तुटल्याने जिल्ह्यातील समीकरणेच बदलली आहेत

पुणे : शिवसेना-भारतीय जनता पक्षातील युती तुटल्याने जिल्ह्यातील समीकरणेच बदलली आहेत. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या इच्छुकांनी याचा फायदा घेण्यासाठी पावले उचलली आहेत. कॉँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असे तीन पर्याय त्यांना उपलब्ध झाले आहेत. खेड : शिवसेनेकडून लढण्यासाठी खेड तालुक्यातून इच्छुकांची संख्या सर्वाधिक होती. तालुक्यातील जवळपास १० जणांनी मुलाखती दिल्या होत्या. आंबेगाव: तालुक्यात खरी लढत ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रस यांच्यात होणार आहे. आंबेगाव तालुक्यातून राष्ट्रवादीतून बंडखोरी करून नुकतेच शिवसेनेत आलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरूण गिरे यांनी प्रचाराला सुरवात देखील सुरवात केली आहे. या बरोवरच उपजिल्हा प्रमुख विजय पवार, प्रा. राजाभाऊ बाणखेले शिवसेनेकडून निवडणूक तयार करण्यास इच्छुक होते. त्यांना पर्याय उपलब्ध झाला आहे. जुन्नर : मतदारसंघातही भाजपचे तसे अस्तित्व नाही. त्यामुळे युती तुटण्याचा काही परिणाम होणार असे वाटत नाही. जुन्नर तालुक्यातून २००९ च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या गटनेत्या तसेच सभापती आशाताई बुचके यांचे नाव आघाडीवर आहेत. पुरंदर : तालुक्यात राष्ट्रवादी तसेच काँगे्रसला शह देत आमदार विजय शिवतारे यांनी विजय मिळविला आहे. भाजपची स्थिती तालुक्यात चांगली नाही. त्यांना येथील जागेसाठी उमेदवार शोधावा लागणार आहे. राष्ट्रवादीचा एखादा बंडखोर उमेदवार त्यांना आयता सापडू शकतो. गेल्या वेळी कॉँग्रेसचे संजय जगताप यांनी बंडखोरी केली होती. त्यांना या वेळी थेट पक्षाची उमेदवारी मिळेल. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून इच्छुकांची मोठी फौज आहे. भोर वेल्हा मुळशी : हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. येथे भाजपचे तसे काहीच अस्तित्व नाही. मात्र, भाजपला मानणारा मतदार भोर शहरात आहे. भाजपला या मतदारसंघात उमेदवारच नाही. भोर तालुकाअध्यक्ष राजेंद्र गुरव यांचे नाव पुढे येऊ शकते. (प्रतिनिधी)