शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

चाकणला कुत्र्याचा धुमाकूळ

By admin | Updated: June 12, 2017 01:14 IST

मोकाट कुत्र्यांसह पिसाळलेल्या कुत्र्याने गेल्या अनेक दिवसांपासून चाकण परिसरात धुमाकूळ घालत चार चिमुकल्या बालकांसह येथील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यालाही जबर

लोकमत न्यूज नेटवर्कआसखेड : मोकाट कुत्र्यांसह पिसाळलेल्या कुत्र्याने गेल्या अनेक दिवसांपासून चाकण परिसरात धुमाकूळ घालत चार चिमुकल्या बालकांसह येथील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यालाही जबर चावा घेत गंभीर जखमी केल्याची घटना चाकण (ता. खेड) येथील बाजारपेठ भागात घडली. चावा घेतलेल्या बालकांसह वीज कर्मचाऱ्याला उपचारासाठी प्रथम चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या ठिकाणी रेबीज लस उपलब्ध नसल्याने त्या सर्वांना पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धुमाकूळ घालणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्यास पकडण्याची कुठलीही यंत्रणा चाकण नगरपरिषदेकडे उपलब्ध नसल्याने पिसाळलेले कुत्रे मोकाट असून, श्वान दंश प्रतिबंधक लस येथील ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असतानाही ती लस रुग्णांना देण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे नागरिक सध्या या कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत. चाकणमधील बाजारपेठ, शनिमंदिर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने गेल्या काही दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रविवारी या पिसाळलेल्या कुत्र्याने बाजारपेठेतील बालगणेश मंडळाच्या समोर श्रवण नितीन पानसरे (वय ८, रा. बाजारपेठ, चाकण) या बालकाच्या खांद्याला चावा घेऊन जबर जखमी केले. शनिमंदिर येथे अथर्व हेमवंत (वय १०) या बालकाच्या पाठीला याच कुत्र्याने चावा घेतला. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सार्थक भगवान कुटे (वय १०, रा. खंडोबामाळ, चाकण) या बालकाला गंभीर जखमा होऊन सुमारे सात टाके घालण्यात आले आहेत. खंडोबामाळ येथे राणी पाटील या आठवर्षीय मुलीला याच कुत्र्याने चावा घेतल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तसेच येथील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यशवंत पोटेसह अन्य ठिकाणीही याच कुत्र्याने सात ते आठ जणांना चावा घेतल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.