शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

CET Exam: पीसीएम, पीसीबी आणि एमबीएची या ३ अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा होणार वर्षातून दोनदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 09:34 IST

विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्यास दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आगामी शैक्षणिक वर्षात पीसीएम, पीसीबी व एमबीए या तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोनवेळा घेण्यात येणार आहेत. त्यात पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल-२०२६ मध्ये, तर दुसरी प्रवेश परीक्षा मे २०२६ मध्ये होईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (दि. ११) केली आहे.

मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीईटी परीक्षा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्चशिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या दोन प्रवेश परीक्षा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. तशाच दोन संधी यापुढे राज्यातील मुला-मुलींनाही मिळणार आहे. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून, दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्यास दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील. येणाऱ्या वर्षी पीसीएम, पीसीबी व एमबीए या तीन अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये; तर दुसरी प्रवेश परीक्षा मे २०२६ मध्ये होईल. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक सीईटी कक्ष लवकरच जाहीर करणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : CET Exams for PCM, PCB, MBA Courses Twice a Year

Web Summary : Maharashtra CET exams for PCM, PCB, and MBA courses will be held twice annually, starting April 2026. Students can appear for one or both exams; the higher score will be considered for admissions. The detailed schedule will be announced soon.
टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थीchandrahar patilचंद्रहार पाटीलMaharashtraमहाराष्ट्र