CET Exam 2022 | सीईटी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 13:31 IST2022-04-09T13:30:40+5:302022-04-09T13:31:19+5:30
गेल्या काही वर्षांपासून या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे....

CET Exam 2022 | सीईटी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर
पुणे : कला, वाणिज्य व विज्ञान हे पारंपरिक अभ्यासक्रम वगळून बहुतांश सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी-सेलतर्फे प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाते. गेल्या काही वर्षांपासून या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासह विधी, व्यवस्थापनशास्त्र, आर्किटेक्चर, बी.एड. आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते.
इयत्ता बारावीनंतरच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या काही अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. मात्र, विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची संधी उपलब्ध आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह १५ एप्रिलपर्यंत, तर विलंब शुल्कासह १६ ते २३ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. एमबीए, एमसीए सीईटीसाठी येत्या २० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे, तर पदव्युत्तर पदवी आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी १० एप्रिलपर्यंत अर्ज करता येईल.
परीक्षेचे नाव : संभाव्य परीक्षेच्या तारखा
एमएचटी-सीईटी : पीसीएम ग्रुप : ११ ते १६ जून, पीसीबी ग्रुप १७ ते २३ जून
एमबीए/ एमएमएस : २४, २५ आणि २६ जून
एमसीए-सीईटी : २७ जून
बी.एचएमसीटी- सीईटी : २८ जून
एम.एचएमसीटी : २८ जून
एम.आर्च : २८ जून
दृश्यकला पदवी व डिझाइन : १२ जून
एलएलबी ३ वर्षे : ४ ते ६ जून
एलएलबी ५ वर्षे : १० जून
बी.पीएड : ३ जून
बी.एड./एम.एड. ९ जून