शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

गोलेगावच्या सैन्यभरतीची शताब्दी

By admin | Updated: January 26, 2015 01:22 IST

शिरूर गावातील प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती सैन्यात असणा-या, सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणा-या गोलेगाव या गावाची सैन्यभरतीची शताब्दी या वर्षी पूर्ण झाली

प्रवीण गायकवाड, शिरूरशिरूर गावातील प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती सैन्यात असणा-या, सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणा-या गोलेगाव या गावाची सैन्यभरतीची शताब्दी या वर्षी पूर्ण झाली. १९१५ साली या गावातील मुकुंद मनाजी कटके हे सर्वप्रथम सैन्यात भरती झाले. तेव्हापासून सैन्यभरतीचा सुरू झालेला सिलसिला आजही सुरू आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या पाल्याला सैन्यात पाठविण्यास पालक धजवत नव्हते. विशेषत: ग्रामीण भागात असे चित्र पाहावयास मिळत असे. अशात तालुक्यातील गोलेगाव हे मात्र यास अपवाद होते. १९१५ साली कटके यांच्यासह गुजाबा पडवळ, दगडू पडवळ आदीदेखील सैन्यात भरती झाले. यांची प्रेरणा घेऊन गावातील इतर घरांतील तरुणही पुढे सैन्यात भरती झाले. सैन्यभरतीचे लोण जणू गावभर पसरू लागले व गावातील प्रत्येक घरातील तरुण सैन्यभरती होऊ लागला. स्वातंत्र्योत्तर काळात हे प्रमाण वाढत गेले. गावातील तरुण सैन्यभरती होत होते. वेळेला निवृत्तही होत होते. मात्र, भागूजी बाळाजी वाखारे, श्रीपती विनोबा भोगावडे, बापू शंकर वाखारे, किसन शंकर वाखारे, बापू मारुती भोगावडे, चिमाजी गणपत इसवे या सैनिकांनी दुसऱ्या महायुद्धात देशासाठी दिलेली प्राणाची आहुती गोलेगांवचे देशाप्रती असलेले प्रेम अधोरेखित करून गेली. या शहिदांबरोबरच १९६२ च्या युद्धात जयराम नारायण महाजन, तर १९७१ च्या युद्धात सोपान बळवंत वाखारे हेदेखील शहीद झाले. कारगिल युद्धात (२०००) बाळासाहेब धोंडिबा गायकवाड शहीद झाले. गावातील एकूण नऊ जण शहीद झाले. मात्र, सैन्यात भरती होण्याचा, देशासाठी प्राणपणाला लावण्याचा जुनुन मात्र कमी झाला नाही. देशसेवेसाठीच आपली मुलं जन्माला आलीत. जणू याच भावनेतून आई-वडील आपल्या पाल्याला सैन्यात भरती करीत राहिले. तालुक्यात निर्माण झालेल्या औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. सिंचन प्रकल्पामुळे बागायत क्षेत्र वाढले. यातून शेती व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या. नदीच्या किनारी असलेल्या गोलेगावातील तरुणांनाही या संधी निर्माण झाल्या. मात्र, देशसेवेचे प्रेम (सैन्यभरती होण्याचे) तसूभरही कमी झाल्याचे आजही दिसत नाही.