गुलाबी थंडीत थर्टी फस्टचे सेलिब्रेशन; पर्यटकांच्या गर्दीने लोणावळा, खंडाळा हाऊसफुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 03:26 PM2022-12-30T15:26:10+5:302022-12-30T15:26:19+5:30

लायन्स पाॅइंट, शिवलिंग पाॅइंट, खंडाळ्यातील राजमाची गार्डन, सनसेट पाॅईट, ड्यूक्स नोज, तुंगार्ली धरणाच्या परिसरात पर्यटकांची गर्दी

Celebrating Thirty First in Pink Winter Lonavala Khandala are full of tourists | गुलाबी थंडीत थर्टी फस्टचे सेलिब्रेशन; पर्यटकांच्या गर्दीने लोणावळा, खंडाळा हाऊसफुल्ल

गुलाबी थंडीत थर्टी फस्टचे सेलिब्रेशन; पर्यटकांच्या गर्दीने लोणावळा, खंडाळा हाऊसफुल्ल

googlenewsNext

विशाल विकारी

लोणावळा: थर्टी फस्ट व न्यू इयर पार्टी सेलिब्रेशनसाठी लोणावळा खंडाळा, कार्ला, पवनानगर परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने सर्व परिसर हाऊसफुल्ल झाला आहे. लोणावळा शहरातील हाॅटेल, खासगी बंगले, फार्म हाऊस, सेकंड होम, पवना भागातील टेन्ट, महाराष्ट्र राज्य पर्यटक विकास महामंडळाच्या खोल्या आरक्षित झाल्या आहेत. ख्रिसमस पासून लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. राष्ट्रीय महामार्गावर दररोज लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

लोणावळ्यात सध्या गुलाबी थंडी पडत आहे. या थंड हवेचा व निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लायन्स पाॅइंट, शिवलिंग पाॅइंट, खंडाळ्यातील राजमाची गार्डन, सनसेट पाॅईट, ड्यूक्स नोज, तुंगार्ली धरणाच्या परिसरात पर्यटक गर्दी करत आहेत. लोणावळ्यातील नारायणीधाम मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर, एकवीरा देवी, वाघजाई देवी मंदिरातदेखील पर्यटक दर्शनासाठी गर्दी करत असल्याचे पहायला मिळत आहे.

हाॅटेल व बंगले व्यावसायिकांनी तसेच टेन्ट व्यावसायिकांनी त्यांच्याकडे राहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी डिजे नाईट व गाला डिनरची व्यवस्था केली असल्याने बुकिंग जवळपास फुल्ल झाली आहे. पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त नियुक्त करण्यात आला असून, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या मद्याच्या पार्ट्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत, राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट झाला आहे. पार्ट्यांच्या दरम्यान जंगल भागात वणवे लावण्याचे प्रकार घडतात याकरिता वन विभागाची पथके तसेच राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा या किल्ल्यांवर अनुचित प्रकार तसेच पार्ट्या होऊ नयेत, यासाठी पुरातत्त्व विभाग व पोलीस विभाग यांची पथके असणार आहेत.

कोरोनामुळे मागील दोन वर्ष थर्टी फस्ट व न्यू इयर पार्ट्यांवर विरजन आले होते. यावर्षी मात्र सर्वांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे. हाॅटेल, चिक्की तसेच टेन्ट व बंगलो व्यावसायिक येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून त्यांच्या करमणुकीसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

Web Title: Celebrating Thirty First in Pink Winter Lonavala Khandala are full of tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.