शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

पालखी मार्गावर राहणार सीसीटीव्हीची नजर

By admin | Updated: June 13, 2015 22:41 IST

पालखी तळावर या वर्षीपासून कायमस्वरूपी सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. महापालिकेकडून पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंग्या विठोबा

पुणे : पालखी तळावर या वर्षीपासून कायमस्वरूपी सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. महापालिकेकडून पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंग्या विठोबा मंदिराच्या परिसरात सुमारे ३२ कायमस्वरूपी सीसीटीव्ही उभारले आहेत. हे काम नुकतेच पूर्ण झाले असल्याने पालखीतळासाठी कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी पालखी निमित्ताने तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही लावले जात होते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा भवानीपेठेतील या दोन मंदिरांमध्ये मुक्कामी असतो. या निमित्ताने लाखो वारकरी या मंदिराच्या परिसरात वास्तव्यास असतात. तर पुणे शहर आणि हद्दीजवळील गावांमधील शेकडो भाविकही दर्शनासाठी या दोन्ही मंदिरात गर्दी करतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून या दोन्ही मंदिराच्या परिसरात कायस्वरूपी सुरक्षाव्यवस्था असण्याच्या उद्देशाने या परिसरात ३२ सीसीटीव्ही बसविण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. पोलीस बंदोबस्तही चोख असणार आहे. (प्रतिनिधी)बाराशे सीसीटीव्ही बसविले -शहराच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून संपूर्ण शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम वेगाने सुरू असून शहरात आत्तापर्यंत जवळपास १२०० कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यात पालखी मार्गाचाही बहुतांश प्रमाणात समावेश आहे. -या सीसीटीव्हींचे प्रक्षेपणही सुरू असून, त्याचा एक नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्त कार्यालयात आहे. लवकरच दुसरा कक्ष महापालिकेतही सुरू होणार आहे. त्यामुळे पालखी मुक्कामी असणाऱ्या मंदिरांबरोबरच या वर्षी पालखी मार्गावरही पोलिसांची नजर राहणार आहे.