शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बोपदेव घाटातील 'त्या' ३ आरोपींची सीसीटीव्ही फुटेज समोर; स्केचही तयार, पोलिसांचा तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 16:30 IST

तीन आरोपींनी तरुणीच्या मित्राने आरडाओरडा करू नये, म्हणून त्याला मारहाण करून एका झाडाला बांधले

पुणे: कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासाेबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीच्या मित्राने तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याबाबतची प्राथमिक माहिती कोंढवा पोलिसांना दिली. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी दहा पथके तयार करण्यात आली आहेत. अशातच तीन संशयितांचे सिसिटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहेत. तर दोघांची स्केचही तयार करण्यात आली आहेत. 

तरुणी मूळची सुरतमधील आहे. तिचा मित्र जळगावमधील आहे. दोघे एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. गुरुवारी (दि. ३) रात्री तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात फिरायला गेले होते. रात्री अकराच्या सुमारास तरुणी आणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले हाेते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तरुणीला धमकावून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिघे जण पसार झाले. घाबरलेल्या तरुणीला मित्राने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनाने याबाबतची प्राथमिक वैद्यकीय माहिती कोंढवा पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तातडीने तपास करण्याचा आदेश देण्यात आला. शुक्रवारी सकाळी याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्कार प्रकरणातील पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची दहा पथके रवाना झाली आहेत.

तरुणीच्या मित्राला झाडाला बांधले...

बलात्कार करण्यापूर्वी तीन आरोपींनी तरुणीच्या मित्राने आरडाओरडा करू नये, म्हणून त्याला मारहाण करून धमकावले. त्याचा शर्ट काढून हात-पाय बांधले. त्यानंतर त्याला एका झाडाला बांधले. आरोपींनी तरुणीवर बलात्कार केला. आरोपी पसार झाल्यानंतर तरुणीने मित्राला सोडवले. त्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले.

पोलिसांची गस्त कागदावरच...

बोपदेव घाटात फिरायला येणाऱ्या तरुण-तरुणींना धमकावून लुटमारीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांना गस्त घालण्याचा आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, गस्त कागदावरच असल्याचे दिसून आले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून ५० मीटर अंतरावरच पोलिस मदत केंद्र आहे. पण, ते नेहमी बंद असल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

बोपदेव घाटात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास मित्राबरोबर फिरायला आलेल्या तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना घडली. तरुणीच्या मित्राने तिला रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर या घटनेची माहिती शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बलात्कार करून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दहा पथके तयार केली आहेत. - रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त

तीन दिवसांपूर्वी घाटात तरुणीचा विनयभंग...

तीन दिवसांपूर्वी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीचे मोटारीतून अपहरण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली होती. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोटारचालक राजेखाँ करीम पठाण (३६, रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली. तक्रारदार तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली होती. त्या वेळी पठाण मोटारीतून तेथे आला. त्याने एका मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी केली. या ठिकाणी जोडप्यांना बंदी आहे, असे सांगून त्याने तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राची मोबाइलमध्ये छायाचित्रे काढली. तरुणीला धमकावून तिला मोटारीत बसण्यास सांगितले. त्यानंतर मोटार कोंढव्यातील खडी मशिन चौकात नेली. तेथील एका गल्लीत मोटार थांबवून तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीला खडी मशिन चौकात सोडून पठाण पसार झाला होता.

अत्याचाराच्या घटनांंमध्ये वाढ

शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. वानवडी परिसरात एका शाळेतील दोन मुलींवर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाने अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (दि. ३) उघडकीस आली. पोलिसांनी चालकाला अटक केली. संतप्त कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड केली होती. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेचे संतप्त पडसाद उमटले होते. विविध संस्था, संघटना, तसेच राजकीय पक्षांनी याप्रकरणी आंदोलन केले होते.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाMolestationविनयभंगcctvसीसीटीव्हीSocialसामाजिक