शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले; मुंढवा पोलिसांची कामगिरी

By नितीश गोवंडे | Updated: February 9, 2024 16:50 IST

आरोपींकडून कोयता, तलवार, रॉड,मिरची पूड, दोरी, गज अशी शस्त्रे जप्त करण्यात आली

पुणे : मुंढवा भागातील केशवनगर भागात पेट्रोल पंपावर जमा झालेली रोख रक्कम लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कोयता आणि तलवार अशी शस्त्रे जप्त करण्यात आली.

कुलदीप उर्फ कुणाल संजय साळुंखे (१९), हर्षवर्धन उर्फ लकी मोहन रेड्डी (१९), तेजस उर्फ सनी अ‌श्विन पिल्ले (२०, तिघे रा. केशवनगर, मुंढवा), शशांक श्रीकांत नागवेकर (२०, रा. सुशील सिद्धी सोसायटी, केशवननगर, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्या बरोबर असलेल्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चारही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.  

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास सुतार आणि तपास पथकातील अंमलदार हे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी, पाहिजे, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करत होते, यावेळी अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, झेड कॉर्नर येथील लोणकर पेट्रोल पंपाच्या मागील बाजूला अंधारात काही मुले थांबली असून काही तरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. यावेळी ते पेट्रोल पंपावर जमा झालेली रोख रक्कम लुटण्याच्या तयारीत असल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून रेड्डी, साळुंखे, पिल्ले, नागवेकर यांना पकडले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता लोणकर पेट्रोल पंपावर उशिरा रात्री लोकांची ये-जा कमी झाल्यावर पेट्रोल पंपावर दिवसभर जमा झालेली रक्कम लुटून घेऊन जाण्याची त्यांची तयारी होती. त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार अंधारात फायदा घेऊन पसार झाले. चौघांकडून कोयता, तलवार, रॉड,मिरची पूड, दोरी, गज अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विलास सुतार, संदीप जोरे, पोलिस उपनिरीक्षक धनंजय गाडे, पोलिस अंमलदार दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, दिनेश राणे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा