शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

जुन्नर येथे अज्ञात चोरट्यांकडून  रोख रक्कम व दागिने लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 3:37 PM

दहा ते बारा अनोळखी महिला घरांघरात जावुन हातावर गोंदवायचे आहे का ? अशी विचारणा करण्याच्या बहाण्याने परिसरातील घराची टेहाळणी करत होत्या

जुन्नर : जुन्नरपोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव सहाणी वरसु बाई मळा येथील घरे अज्ञात चोरट्यानी रविवारी (दि.१६) रात्री फोडुन या घरातील रोख रक्कम व देवाचे चांदीचे दागिने असा ऐवज पळवुन नेला आहे.   वडगाव सहाणी येथील दगडु गेणु तांबोळी हे व त्यांचे कुटुंबीय घरात झोपले असताना घराचा दरवाजा व कडी कोयंडा तोडुन चोरट्यानी देवघरात असलेला अर्धा किलो चांदीचा गाठा तसेच कपाटातील रोख रक्कम पाच हजार रुपये रोख चोरुन नेले . तसेच त्यांच्या घराशेजारी तानाजी तांबोळी यांचे घरात प्रवेश करून फोडुन घरातील चार हजार रुपये रोख,चांदीचे तीन पैजणे ,घरातील कपडे तर चंद्रकांत तांबोळी यांचे घरातील सात हजार रुपये रोख व लहु शिंदे यांच्या घरातुन ६५००/- रुपये रोख रक्कम पळवुन नेली. राजेंद्र तांबोळी याचे घर फोडून झोपलेल्या माणसांवर स्प्रे फवारल्याने कोणालाही जाग आली नाही असे फिर्यादी तांबोळी यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद साबळे हे पुढील तपास करत आहे. रविवारी दुपारी वडगाव सहाणी परिसरात दहा ते बारा अनोळखी महिला घरांघरात जावुन हातावर गोंदावयाचे आहे का?अशी विचारणा करण्याच्या बहाण्याने परिसरातील घराची टेहाळणी करत होत्या व रात्री या घरफोड्या झाल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले.  

टॅग्स :Junnarजुन्नरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी