FTII च्या आवारात वादग्रस्त फलक लावल्याप्रकरणी विद्यार्थी संघटनेच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा

By नम्रता फडणीस | Published: January 24, 2024 12:12 PM2024-01-24T12:12:18+5:302024-01-24T12:12:57+5:30

वादग्रस्त फलकामुळे सामाजिक ऐक्याला बाधा पोहचण्याची शक्यता

Case against 7 members of student union for putting up controversial board in FTII premises | FTII च्या आवारात वादग्रस्त फलक लावल्याप्रकरणी विद्यार्थी संघटनेच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा

FTII च्या आवारात वादग्रस्त फलक लावल्याप्रकरणी विद्यार्थी संघटनेच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा

पुणे : एफटीआयआयच्या आवारात वादग्रस्त फलक लावल्याप्रकरणी ‘एफटीआयआय’मधीलविद्यार्थी संघटनेच्या सात पदाधिकाऱ्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सायनतन चरण चक्रवर्ती, नाथन चक्रपाध्याय, मनकलन चक्रवर्ती, त्रिशा बंदना मन्ना, मधुरिमा मगन्का मैती, मनकप सेलोन नोकवोहम, रितागनिकी देबारती भट्टाचार्या अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ऋतुजा अतुल माने (रा. कोथरुड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

माने समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्थेच्या महिला अध्यक्षा आहेत. ‘एफटीआयआय’च्या आवारात मंगळवारी वादग्रस्त फलक लावण्यात आल्याची माहिती मंगळवारी दुपारी मिळाली. त्यानंतर माने यांनी याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पडवळ आणि कार्यकर्त्यांना दिली. ‘एफटीआयआय’च्या आवारात स्टुडंट्स असोसिएशनने फलक लावल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारच्या फलकामुळे सामाजिक ऐक्याला बाधा पोहचण्याची शक्यता आहे. धार्मिक सलोखा बिघवडविण्याचे काम विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे माने यांनी फिर्यादीत म्हटले आहे. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Web Title: Case against 7 members of student union for putting up controversial board in FTII premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.