कर्नाटकातील गाड्यांना पुण्यात फासले काळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 11:17 IST2025-02-23T11:14:59+5:302025-02-23T11:17:54+5:30
या घटनेची माहिती अगोदरच मिळाल्यामुळे पोलिसांनी येथे कडेकोट बंदोबस्त लावला होता.

कर्नाटकातील गाड्यांना पुण्यात फासले काळे
पुणे - कर्नाटकातील बस थांब्यावर मराठीबसचालकाला मारहाण झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लक्ष्मीनारायण पार्किंग येथे कर्नाटकातील बस गाड्यांना काळे फासले आहे. या घटनेची माहिती अगोदरच मिळाल्यामुळे पोलिसांनी येथे कडेकोट बंदोबस्त लावला होता. तरीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घुसखोरी करत, कर्नाटक सरकारच्या गाड्यांना काळे फासून मराठी माणसाला मारहाण केल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
सरकारने सीमा प्रश्न सोडवावा, सरकारचा धिक्कार असो, मराठी माणसावर अन्याय झालेला खपवून घेतला जाणार नाही, एसटी चालकाला झालेली मारहाण खपवून घेतली जाणार नाही, आम्हीही रस्त्यावर उतरू आणि जशास तसे उत्तर देऊ अशा घाेषणांनी परिसर दणाणून साेडला. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आंदाेलकांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मराठी माणूस बसचालक कर्नाटकात बस घेऊन गेला असता, कानडी भाषा येत नसल्यावरून कानडी लोकांनी त्यांना मारहाण केली. हा प्रकार समोर येताच पुण्यात याचा उद्रेक झाला. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेकडून कर्नाटकातील घटनेचा निषेध केला. शिवसेनेकडून कर्नाटक बसला काळे फासले.