शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार, उपचारादरम्यान २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

By नितीश गोवंडे | Updated: September 9, 2024 17:48 IST

‘दादा पोतं उचलायला जायचे आहे माझ्या सोबत चल’ असे म्हणत तो जयदीपला घराबाहेर घेऊन गेला होता

पुणे : घराच्या समोर राहणाऱ्या युवकाने २२ वर्षीय युवकाला पोते उचलायचे आहे, असे सांगून घराबाहेर नेले. त्यानंतर युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. उत्तमनगर येथील जुनी मासे आळी येथे रविवारी (दि. ८) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर (२२, रा. गुजर कॉम्प्लेक्स, मासे आळी, उत्तमनगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर, अमित सुदाम गुजर (२१, रा. सदर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जयदीपची आई लक्ष्मी भोंडेकर (४२) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप रविवारी दुपारी घरात झोपलेला होता. आरोपी अमित त्याच्या घरी आला. त्याने ‘दादा पोतं उचलायला जायचे आहे माझ्या सोबत चल’ असे म्हणत तो जयदीपला घराबाहेर घेऊन गेला. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी भोंडेकर याच्यावर कोयत्याने वार केल्याचे आई लक्ष्मी भोंडेकर यांना समजले. त्या जयदीपच्या मित्रांसोबत जुनी मासे आळीतील घर नं. ७९६ या घराजवळ गेल्या असता जयदीप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

यानंतर जयदीपला उचलून रिक्षाने खासगी रुग्णालयात नेले. दरम्यान, जयदीपने अमित गुजर याने डोक्यात कोयता मारल्याचे त्याच्या आईला सांगितले. यानंतर जयदीपवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी (दि. ८) सकाळी त्याचा मृत्यू झाला. अमित गुजर याने नेमका खून कशासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यूUttam Nagar Policeउत्तम नगर पोलीस