शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

कलाकाराची दखल योग्य वेळी घ्यावी - डॉ. सलील कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 2:28 AM

डॉ. सलील कुलकर्णी : ‘संगीत साधना पुरस्कार’ प्रदान सोहळा

पुणे : आपल्याकडे आजपर्यंत कोणत्याही कलाकारांचे जिवंतपणी एखाद्या व्यक्तीच्या नावाने पुरस्कार देऊन कौतुक केले नाही. या पुरस्काराची थैली व्यक्तीला अशावेळी दिली जाते, जेव्हा त्याला या थैलीचा काहीच उपयोग नसतो. मानपत्र अशाकाळात दिले जाते, ज्यावेळी त्या माणसाची दृष्टी काम करत नसते. त्यामुळे प्रत्येक कलाकाराच्या कामाची दखल ही योग्य वेळी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी केले.

ग्लोबल स्टार फाऊंडेशन आणि इंडियन टॅलेंट सर्च अ‍ॅकॅडमी आयोजित संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार समारंभ संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांना संगीत साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच आदर्श शाळा पुरस्कार पुणे पब्लिक स्कूलला देण्यात आला आणि आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने जेजुरीतील जिजामाता शाळेतील मुख्याध्यापिका सुनीता सावंत यांना सन्मानित करण्यात आले. आदर्श शिक्षक पुरस्कार मुक्तांगण इंग्लिश स्कूलमधील श्रीमती बापट यांना देण्यात आला. यावेळी वीरेंद्र चव्हाण, डी. जी. शिंदे, तेजस चव्हाण, नितीन ढेपे, तन्मय देवचक्के, अनुराधा हाटकर आदी उपस्थित होते. उतारवयात पुरस्कार मिळून उपयोग काय? याच कलाकारांना जर त्यांच्या प्रगतीच्या काळात पुरस्कार दिले तर ही मंडळी त्यांच्या कारकिर्दीचा महत्त्वाचा टप्पा अगदी सहजपणे पार करू शकतील, अशी भावना डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.हा सन्मान अभिषेकी घराण्याचा...आजचा हा सन्मान माझा नसून अभिषेकी घराण्याचा आहे. सलीलच्या सांगीतिक वाढीचा मी साक्षीदार आहे. डॉक्टरकीतून संगीताकडे आणि संगीताकडून गायकीकडे असे त्यांचे विविध पैलू सांगीतिक वाढ होताना पाहिले आहेत. मला त्यांच्या गायनाचा नेहमीच अभिमान आहे. त्यांची मी बरीचशी गाणी गायिली आणि त्यांच्या प्रत्येक गाण्यातून मी नवीन काही शिकलो आहे, असे शौनक अभिषेकी यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेartकला