पुणे: कारच्या धडकेत आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना वढू खुर्द गावात घडली. या प्रकरणी कारचालकाविरोधात लोणीकंद पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. मैराबी रसूलसाब बळीगर (वय ८, रा. सोमेश्वर पार्क, लोणीकंद, पुणे-अहिल्यानगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.
याबाबत लालासाब महमंदसाब कालेगार (वय ३९, रा. लोणीकंद, मूळ रा. जुमलापूर, कर्नाटक) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी कारचालक भरत रमेश नेहेते (वय ४६, रा. रामनगर, वढू खुर्द, ता. हवेली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैराबी हिचे आई-वडील मजुरी करतात. वढू खुर्द भागातील शेडमध्ये मैराबी झोपली होती. शुक्रवारी (दि. ३) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शेडमध्ये कारचालक कार लावत होता. तेथे अंधार होता. अंधारात शेडमध्ये झोपलेली मैराबी कारचालकाला दिसली नाही. कारचे चाक तिच्या अंगावरून गेल्याने तिचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक नीलेश घाेरपडे पुढील तपास करत आहेत.
Web Summary : An eight-year-old girl died in Vadhu Khurd after a car ran over her while she slept in a shed. The driver, Bharat Nehete, has been charged by Loni Kand police. The girl's parents are laborers.
Web Summary : वडू खुर्द में एक आठ वर्षीय लड़की की मौत हो गई, जब वह एक शेड में सो रही थी और एक कार उसके ऊपर से गुजर गई। ड्राइवर भरत नेहेते पर लोनी कांड पुलिस ने आरोप लगाए हैं। लड़की के माता-पिता मजदूर हैं।