The car suddenly took a fire on the Pune University Chowk | पुणे विद्यापीठ चौकात कारने घेतला अचानक पेट 
पुणे विद्यापीठ चौकात कारने घेतला अचानक पेट 

पुणे : पुणे विद्यापीठ चौकात सायंकाळी अचानक एसयूव्ही 500 गाडीने पेट घेतल्याने  विद्यापीठ चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती . गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने गाडीने पेट घेतला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बाहेरकडून पुण्याच्या दिशेने जाणारी गाडी विद्यापीठ चौकातील सिग्नलला उभी होती.मात्र, त्यानंतर या गाडीने अचानक पेट घेतल्याने गाडी बसलेले ड्रायव्हर व नागरिक लगेच खाली उतरले. त्यामुळे या अपघातात कोणीही  जखमी झाले नाही.यानंतर तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले व अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली सिग्नल वरील गाडी घेतली. संध्याकाळच्या दरम्यान विद्यापीठ चौकात घरी जाणा?्या वाहनांची गर्दी असते या दरम्यानच ही घटना घडल्याने वाहतूक पोलिसांच्या समस्यांमध्ये अधिक भर पडली होती.

Web Title: The car suddenly took a fire on the Pune University Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.