भरधाव मोटारीची दुचाकींना धडक, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:22 IST2018-10-03T00:22:10+5:302018-10-03T00:22:29+5:30

एक ठार : पुणे-नाशिक महामार्गावरील घटना

The car rammed into the car, and killed one | भरधाव मोटारीची दुचाकींना धडक, एक ठार

भरधाव मोटारीची दुचाकींना धडक, एक ठार

मंचर : आंबेगाव तालुक्यातील पुणे-नाशिक रस्त्यावरील पेठ येथे भरधाव वेगातील इनोव्हा कारने दोन दुचाकींना उडवले. या अपघात दुचाकींवरील एक जण ठार, तर दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. २) सायंकाळी ४ वाजता घडली. प्रफुल्ल उत्तम शिंदे (वय २६, रा.पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. जखमींवर मंचर येथील रिद्धी सिद्धी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : पेठ बायपासनजीक असणाऱ्या रानवारा पेट्रोलपंपावरून (एमएच १४ बीएल ६०६७) या दुचाकीवरून विशाल कराठे (वय १८) आणि त्याच्या पाठीमागे बसलेला अरुण धुमाळ (वय ४८) हे पेठ गावाकडे जात होते. या वेळी पुण्याकडे जाणाºया (एमएच ३९ व्ही ५०५५) या इनोव्हा कारने दुचाकीला धडक दिली. अपघात करून इनोव्हा कारचालक इनोव्हा गाडीसह पळून गेला. पुढे पेठ गावच्या बायपासवरून यूटर्न करून इनोव्हा चालक भांबावलेल्या अवस्थेत रस्त्याच्या दुसºया बाजूने मंचरच्या दिशेने माघारी येत असताना दुसºया दुचाकीला (एमएच १४ एए २५४७) धडकला. त्यात प्रफुल्ल उत्तम शिंदे (वय २६, रा.पेठ) जागीच ठार झाला.
या अपघातातील इतर जखमींवर मंचर येथील रिद्धी सिद्धी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. या अपघातातील इनोव्हाचा चालक पळून गेला आहे. मंचर पोलीस इनोव्हा कारचालकाचा शोध घेत असून, कारचालका विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The car rammed into the car, and killed one