Pune: भोर - महाड रस्त्यावरील वरंध घाटातील खोल दरीत कार पडुन अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 14:41 IST2023-12-25T14:40:58+5:302023-12-25T14:41:19+5:30

वर्षभरातला हा १० वा अपघात आहे....

Car falls into a deep gorge in Varandh Ghat on Bhor-Mahad road | Pune: भोर - महाड रस्त्यावरील वरंध घाटातील खोल दरीत कार पडुन अपघात

Pune: भोर - महाड रस्त्यावरील वरंध घाटातील खोल दरीत कार पडुन अपघात

भोर (पुणे) : भोर - महाड रस्त्यावरील वरंध घाटातील वारवंड शिरगावच्या दरम्यान कार दरीत पडून अपघात झाला आहे. अपघातात नवरा-बायको जखमी झाले असून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. वर्षभरातला हा १० वा अपघात आहे.

भोर महाड रस्त्यावरील वारवांड ते शिरगाव दरम्यानच्या रस्त्यावर आज सकाळी चारचाकी गाडी निरादेवघर धरणाच्या बाजूला खोल दरीत पडून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून गाडी धरणाच्या पाण्यात गेली नाही. दरम्यान, दोन्ही जखमींना वरंधा घाट मार्गावरील प्रवाशांनी अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढून भोरकडे उपचारासाठी आणण्यात आले. निरा-देवघर धरणाच्या पाण्यात, तसेच दरीत वाहने कोसळण्याची मागील वर्षभरातील १०वी घटना आहे. अपघातातील चारचाकी वाहन खोल दरीत झाडाझुडपात, तसेच धरणाच्या पाण्याच्या बाजूलाच कोसळल्याने गाडीचा नंबर समजू शकला नाही.

वर्षभरात दहा अपघात पाच जणांचे मृत्यू तर अनेक जखमी झाले आहेत. भोर महाड रस्त्यावरील वरंध घाटातून महाडकडे जाताना वेडीवाकडी वळणे तीव्र उतार आणि चढ असून, एका बाजूला धरण तर दुसऱ्या बाजूला डोंगर आहेत. धरणाच्या बाजूला कठडे नाहीत, दिशादर्शक फलक, सूचना फलक नाहीत, त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने मागील एक वर्षात दहा अपघात होऊन पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेक जण जखमी झाले आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी नागरिक करीत आहेत.

Web Title: Car falls into a deep gorge in Varandh Ghat on Bhor-Mahad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.