शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकाच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटनेरला कारची धडक ; चाैघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 20:47 IST

बाह्यवळण मार्गावर सतरा कमानी पुलाजवळ कंटेनरला मागील बाजूने कार धडकून झालेल्या अपघातात कारमाधील चौघे ठार झाले.

शिरूर: बाह्यवळण मार्गावर सतरा कमानी पुलाजवळ कंटेनरला मागील बाजूने कार धडकून झालेल्या अपघातात कारमाधील चौघे ठार झाले. यात दोन सख्खे भाऊ, त्यांची आई अशा मायलेकरांचा व वीस दिवसांच्या नवजात बालकाचा समावेश आहे. या बालकाची आई गंभीर जखमी झाली आहेेे.

किशोर माधव हाके (वय ३२ वर्षे ), लिंबाजी उर्फ़ शुभम माधव हाके ( वय २५ वर्षे ),विमलबाई माधव हाके ( वय ६० वर्षे ), नवजात बालक ( २० दिवस ) सर्व रा.  सध्या रायसोनि कॉलेजचे पाठीमागे मातोश्री बिल्डिंग वाघोली पुणे. मुळ रा. रामतिर्थ ता. लोहा जि. नांदेड अशी मृतांची नांवे आहेत. नवजात बालकाची आई पुष्पा हाके या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त स्थळाजवळ असणाऱ्या एका चहाच्या स्टॉलवरील रमेश पांडुरंग चौधरी या व्यक्तीने अपघाताची पाेलिसांना माहिती दिली. 

आज पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला. दुभाजकाच्या बाजूला एक कंटेनर डिझेल संपल्याने जागेवर उभा होता. पहाटे चारच्या दरम्यान औरंगाबादहून पुणे बाजुला जाणारी वॅगनर कार ( क्र. एमएच -१२ क्यूडब्ल्यू ८५०२ ) कंटेनरला ( क्र. आर जे 05 जी बी 2433 ) मागील बाजूने धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की, कारचा चेंदामेंदा झाला. यात चौघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर , पोलिस कर्मचारी जनार्दन शेळके , रवींद्र पाटमास , क्रुष्णा व्यवहारे , हेमंत शिंदे , संजय जाधव , गजानन जाधव , सुरेश नागलोथ , अभिषेक ओव्हाळ यांच्यासह अपघात स्थळी धाव घेतली.स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले व गंभीर जखमी पुष्पा हाके यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.  किशोर हाके हा दुसऱ्याच्या वाहनावर चालक म्हणून काम करायचा. मात्र अलिकडे त्याने स्वतःची दोन वाहने घेऊन टुरीस्टचा व्यवसाय करीत होता. हाके यांनी दहा ते बारा दिवसापूर्वी आपली पत्नी पुष्पा यांना बालकासह त्यांच्या माहेरी, औरंगाबाद येथे सोडले होते. काल संध्याकाळी किशोर हे आपली आई, भाऊ व भाची यांना घेऊन पत्नीला आणण्यासाठी औरंगाबादला गेले होते. बाळ पाठवताना तिथे एक छोटासा कार्यक्रमही घेण्यात आला. हा आनंदमय कार्यक्रम आटोपून  किशोर हाके रात्री एकच्या सुमारास पत्नी व बाळाला घेऊन वाघोलीच्या दिशेने निघाले. त्यांची कार सतरा कमानीचा पूल ओलांडून पुढे शिरूर बाह्यवळण मार्गावर आली असता उभ्या कंटेनरला धडकली. यात मायलेकरांसह बाळालाही प्राण गमवावे लागले.

टॅग्स :AccidentअपघातShirurशिरुरDeathमृत्यू