निरा देवघर धरणात कार कोसळली; एक जण बचावला, तिघांचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 10:44 IST2023-07-29T10:43:17+5:302023-07-29T10:44:01+5:30

कार कठडा तोडून घाटातून निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळली.

Car crashes into Nira Deoghar Dam in Pune; One person survived, the search for the three is on | निरा देवघर धरणात कार कोसळली; एक जण बचावला, तिघांचा शोध सुरु

निरा देवघर धरणात कार कोसळली; एक जण बचावला, तिघांचा शोध सुरु

पुणे - पुण्याहून वरंदा घाटमार्गे महाडला जाणारी कार निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळली. या कारमधील ४ जण होते. त्यातील एकाला वाचविण्यात यश आले आहे. गाडीतील ३ जण बुडाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील ही कार भोरहून पुढे वरंदा घाटातून जात होती. धुके आणि पाऊस यामुळे कारचालकाला रोडचा अंदाज आला नाही. कार कठडा तोडून घाटातून निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळली. कारमधील एक जण बाहेर आला आहे. भोर पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. तिघांचा शोध सुरु आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात...

Web Title: Car crashes into Nira Deoghar Dam in Pune; One person survived, the search for the three is on

टॅग्स :Accidentअपघात