कार-कंटेनरची समोरासमोर धडक, चार गंभीर; लोणीकंद-थेऊर अष्टविनायक महामार्गावरची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 23:20 IST2024-04-28T23:18:42+5:302024-04-28T23:20:00+5:30
हा अपघात रात्री सात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडला. लोणीकंद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

कार-कंटेनरची समोरासमोर धडक, चार गंभीर; लोणीकंद-थेऊर अष्टविनायक महामार्गावरची घटना
वाघोली : लोणीकंद-थेऊर या अष्टविनायक महामार्गावर बकोरी फाट्याजवळी जोगेश्वरी मंदीरा समोर कंटेनर व कारमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत सात जण जखमी झाले.यातील चौघे जण अती गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचुर झाला. हा अपघात रात्री सात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडला. लोणीकंद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
या धडकेत कारचा चक्काचुर झाला.कार मध्ये सात जण होते. त्यातील चौघे गंभीर जखमी झाले आहेत. गणेश जाधव, विनोद भोजणे, विठ्ठल जोगदंड, हेमंत देसाई अशी रुग्णालयात दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यांना वाघोली व खराडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कारचा चालक अपघात ग्रस्त गाडीतच अडकून पडला होता. लोणीकंद पोलीस व स्थानिक नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. लोणीकंद पोलीस व लोणी वाहतूक विभागाने दोन्ही वाहने बाजूला करून कोंडी दूर केली.
जोगेश्वरी मंदिरा समोर मोठे वळण आहे. वनविभागाने तेथे संरक्षक जाळी बसविल्याने वळण तीव्र झाले आहे. यामुळे तेथे नेहमी छोटे मोठे अपघात होत असल्याचे तेथील रहिवासी व माहिती अधिकारी कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले.