शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कारची जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी, यवतजवळ भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:34 IST

अपघातास कारणीभूत ठरलेल्या कार चालकाचा रक्त नमुना घेतला असून तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, यावरून त्याने मद्यप्राशन केले की नाही, याबाबत खुलासा होणार

यवत : पुणे-सोलापूर महामार्गावर यवत (ता. दौंड) येथे काल (दि. २०) सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात लाल रंगाच्या स्विफ्ट कार चालकावर बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात अशोक विश्वनाथराव थोरबोले (वय ५७, रा. उरळी कांचन, मूळ गोजवडा, ता. वाशी, जि. धाराशिव), गणेश धनंजय दोरगे (वय २८, रा. यवत रावबाचीवाडी, ता. दौंड) यांचा मृत्यू झाला आहे. तर 

अपघातात मृत्यू पावलेल्या अशोक थोरबोले यांचे भाऊ ज्ञानेश्वर थोरबोले यांनी यवत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी राकेश मारुती भोसले याच्याविरुद्ध भादंवि कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४)(५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर विश्वनाथ थोरबोले (वय ४९, रा. उरळी कांचन), राकेश मारुती भोसले (स्विफ्ट चालक, रा. बोरीभडक, ता. दौंड) , सचिन रमेश दोरगे (रा. यवत, ता. दौंड) , वैभव रमेश दोरगे (रा. यवत, ता. दौंड) , हृषीकेश बाळासाहेब जगताप हे जखमी झाले आहेत.             यवत गावाजवळील शेरू हॉटेलसमोर महामार्गावर लाल रंगाच्या स्विफ्ट कारने (एम एच १२ वाय डब्ल्यू.५०५२ ) भरधाव वेगात डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर ( एम एच १२ टी वाय ७५३१ ) ला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की स्विफ्ट डिझायर कारमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात आणखी एका वाहनाला (एम एच १२ एन यू. ५५०१) देखील धडक बसून मोठे नुकसान झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने वाहन चालवून रहदारी नियमांचे उल्लंघन केले व हा अपघात घडवून आणला. अपघातात तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या स्विफ्ट कार चालकाचा रक्त नमुना घेतला असून तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर चालकाने मद्यप्राशन केले होते की नाही, याबाबत खुलासा होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसcarकारDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल