शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

"एकट्याने प्रवास करायला रिक्षा परवडत नाही, म्हणून बाइकटॅक्सीला प्राधान्य देतो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 11:53 IST

रिक्षाचालकांच्या आंदोलनानंतर पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये थेट रॅपिडो कंपनीशी संबंधितांवर गुन्हा दाखल

पिंपरी : बाइकटॅक्सी प्रवासी वाहतुकीला महाराष्ट्रात परवानगी नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बाइकटॅक्सी धावत आहेत. नुकताच बाइकटॅक्सीची ऑनलाइन सेवा देणाऱ्या रॅपिडो या कंपनीवरती एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड (आरटीओ) यांनी फिर्याद दिली. मात्र, बाइकटॅक्सीच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रवाशांना विचारले असता, त्यांनी परवडतील असे भाडेदर असल्याने बाइकटॅक्सीची सेवा स्वीकारल्याचे सांगितले. सरासरी आठ रुपये किलोमीटर या दराने बाइकटॅक्सी धावत आहेत. त्यामुळे इतर सेवा टाळून अनधिकृत बाइकटॅक्सी घेण्याकडे प्रवाशांचा कल दिसून येतो.

रिक्षाचालकांच्या आंदोलनापूर्वी बाइकटॅक्सी चालवणाऱ्यांवर आरटीओकडून केवळ दंडात्मक कारवाई करून सोडण्यात येत होते. मात्र, रिक्षाचालकांच्या आंदोलनानंतरपुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये थेट रॅपिडो कंपनीशी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

काही जणांना पिंपरी ते पुणे प्रवास करायचा असतो. नाहीतर पुणे स्टेशन ते चांदणी चौक. रिक्षाचालक तसेच ओला उबेर यांचे दर ठरलेले असतात. त्यामुळे एकट्या प्रवाशाने रिक्षा किंवा ओला उबेर करणे परवडणारे नाही. त्यामुळे ओला कार आणि रिक्षापेक्षा निम्म्या दरात सेवा देणाऱ्या बाइकटॅक्सीने (रॅपिडो) प्रवास करण्यास प्राधान्य देतात.

बाइकटॅक्सीचे दर किलोमीटर - एक किलोमीटर सरासरी आठ रुपये

रिक्षा - पहिल्या दीड किलोमीटरसाठी २५ रुपये, पुढील प्रत्येक किलोमीटरमागे १७ रुपये

ओला-उबेर - सरासरी १० किलोमीटर रुपयांपेक्षा अधिक

मी प्रवासाला बाइकटॅक्सीला प्राधान्य देतो

एकट्याने प्रवास करायला रिक्षा परवडत नाही. त्यात मला डेकोरेशनच्या कामासाठी सतत प्रवास करावा लागतो. त्यामुळे रॅपिडोच्या बाइकटॅक्सीचे दर कमी असल्याने मी प्रवासाला बाइकटॅक्सीला प्राधान्य देतो. मी खडकी ते महर्षीनगर हा प्रवास अवघ्या ११० रुपयांमध्ये केला. - प्रसनजीत भौमिक, रॅपिडो प्रवासी

...तर संबंधित पोलिस यंत्रणा त्यावर कारवाई करते

ऑनलाइन माध्यमांमध्ये काही अपवाद वगळता ॲप बेकायदेशीर आहे की नाही, याची व्यवस्था नाही. मात्र, त्या ॲपवरून बेकायदेशीर कृत्य केले जात असेल तर संबंधित पोलिस यंत्रणा त्यावर कारवाई करते. - संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,

एका ठिकाणी काम करून दुपारनंतर बाइकटॅक्सी चालवतो

बाइकटॅक्सी बेकायदेशीर आहे, याविषयी मला माहीत नाही. मात्र, बाइकटॅक्सीमुळे मला जे भाडे होते त्यातील ८० टक्के रक्कम मिळते. २० टक्के कंपनी घेते. त्यामुळे मी सकाळी एका ठिकाणी काम करून दुपारनंतर बाइकटॅक्सी चालवतो. - बाइकटॅक्सीचालक

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाSocialसामाजिकbikeबाईकagitationआंदोलन