शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवाराच्या घरी भानामती?

By admin | Updated: July 28, 2015 00:37 IST

ग्रामपंचायती निवडणुकीसाठी जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, मतदारांना विविध आमिषे दाखविण्यात येत आहेत. इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गावात या निवडणुकीतून

भिगवण : ग्रामपंचायती निवडणुकीसाठी जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, मतदारांना विविध आमिषे दाखविण्यात येत आहेत. इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गावात या निवडणुकीतून भानामतीचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. एका महिला उमेदवाराच्या घराचा उंबरा पुजल्याने येथे खळबळ उडाली आहे.या प्रकारातून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उमेदवाराला घाबरविण्यासाठी केलेल्या या प्रकाराची परिसरात चर्चा आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना उघड झाल्यानंतर खळबळ उडाली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गावातील राजपीर वर्धनी माता पॅनलच्या दोन नंबर वार्डाच्या महिला उमेदवार अनिता परदेशी यांच्या घरासमोरील उंबरा अज्ञात व्यक्तीने हळद, कुंकू, गुलाल टाकून पुजला. त्यानंतर उंबऱ्यावर १०० रुपयांची नोट ठेवली होती. सकाळी ७ वाजता झोपेतून उठल्यावर परदेशी यांच्या हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. परदेशी यांनी लागलीच हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आणून दिला.याविषयी परदेशी त्यांनी हा प्रकार घरातील सदस्यांना घाबरविण्याच्या हेतूने अज्ञाताने केलेला असण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच, अशा प्रकारांना आपले कुटुंब घाबरणार नाही. अशा प्रकारांना महत्त्व देणार नाही. आपली काही तक्रार नाही. तक्रारवाडी गावात पहिल्यांदाच अंधश्रद्धेचा हा प्रकार घडला. हा प्रकार म्हणजे भानामती असल्याची चर्चा दिवसभर गावात होती. दोन पॅनलमधील उमेदवारांत संभ्रम निर्माण होण्यासाठी कोणीतरी हा खोडसाळपणा केला असल्याने याबाबत पोलीस ठाण्यात कसलीही तक्रार दाखल केली नसल्याचे परदेशी यांनी सांगितले. (वार्ताहर)